नांदेडचा विमानतळ सुरू करण्यात यावे खासदार डॉ फौजिया खान यांची राज्यसभेत मागणी
परभणी:( जिल्हा प्रतिनिधी मोहम्मद बारी ) नांदेड विमानतळ सुरू होण्यासाठी डॉ फौजिया खान खासदार यांनी राज्यसभेत महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात नांदेड येथे एक विमानतळ अनेक वर्षांपूर्वी तयार करण्यात आले आहे. या विमानतळावरून गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वी मुंबई व ईतर ठिकाणी विमान सेवा सुरु होती. परंतु नंतर हे विमान सेवा खंडित करण्यात आली. नांदेड हे शिख समुदायाचे एक मोठे धार्मिक स्थळ आहे येथे देश व परदेशातून भाविक भक्त येतात. त्याचेसाठी तसेच मराठवाडा या भागातून देशातील दिल्ली मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये संपर्क करण्यासाठी नांदेड विमानतळ पूर्ववत सुरू करावे यासाठी खासदार डॉ फौजिया खान यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला.
या प्रश्नाचे उत्तरात विमान वाहतूक मंत्री ज्योतीरादित्य सिंधिया साहेब यांनी सदर प्रश्नाचे ऊत्तरात राज्य शासनाने सदरचे विमानतळ एका खाजगी कंपनीला दिलेले आहे आणि त्या खाजगी कंपनीकडून या विमानतळाचे कामकाज योग्यरीत्या केल्या जात नाही असे नमूद करून जर राज्य सरकारने सदरचे विमानतळ त्यांचे ताब्यात घेऊन त्या ठिकाणी विमान वाहतूक करण्यालायक परिस्थिती निर्माण केल्यास विमान वाहतूक मंत्रालय सदरची सेवा सुरू करण्यास अनुकूल असल्याचे सांगितले. सदरची विमान वाहतूक ही मराठवाड्याच्या पूर्व भागाचे विकासात एक महत्वाचा घटक ठरणारी आहे व यासाठी खासदार डॉ फौजिया खान यांनी एक प्रयत्न केला आहे याबद्दल त्याचे जनतेतुन कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.