हेल्थ
मातोश्री केअर क्लिनिक सांगवी बु येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर
नांदेड दि.18. सांगवी बु. येथील डॉ.प्रवीण खिल्लारे यांच्या मातोश्री केअर क्लिनिक भुक्तरे कॉम्प्लेक्स विमानतळा जवळ सांगवी बु. येथे दि.19 नोव्हेंबर 2023 रोज रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरामध्ये सर्व रोगांचे मोफत निदान करण्यात येईल त्याच बरोबर सर्व रक्त तपासण्यांवर 50% सवलत देण्यात येईल तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या मोफत रोग निदान शिबिराचा लाभ घ्यावा.अल्पावधीतच डॉ. प्रवीण खिल्लारे यांच्या मातोश्री केअर क्लिनिक ने रुग्णांच्या मनात उत्तम सेवा देऊन विश्वासाचे स्थान मिळवले आहे. या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. प्रवीण खिल्लारे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.