नांदेड -पनवेल-नांदेड दिवाळी विशेष गाड्यांच्या चार फेऱ्या
प्रवाशांची मागणी लक्षात घेवून, दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड विभागाने नांदेड ते पनवेल दरम्यान दिवाळी विशेष गाड्या चालविण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे —
01. नांदेड-पनवेल विशेष गाडी : गाडी क्रमांक 07615 नांदेड ते पनवेल विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 10 आणि 17 नोव्हेंबर, 2023 ला रात्री 23.00 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, नगरसोल, अंकाई, मनमाड, नासिक, इगतपुरी, कल्याण मार्गे पनवेल येथे दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी 12.20 वाजता पोहोचेल.
02. पनवेल-नांदेड विशेष गाडी : गाडी क्रमांक 07616 पनवेल ते नांदेड विशेष गाडी पनवेल येथून दिनांक 11 आणि 18 नोव्हेंबर, 2023 ला दुपारी 13.20 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी 04.00 वाजता पोहोचेल.
या गाडीत वातानुकुलीत, स्लीपर आणि जनरल असे एकूण 20 डब्बे असतील.
गाडीचे वेळापत्रक सोबत जोडले आहे.