जिला

आरक्षणासाठी अर्धापूर येथे साखळी उपोषण सुरू..!

अर्धापूर  ( शेख जुबेर )  राज्यातील मराठा आरक्षण प्रश्नावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अर्धापूर येथील तहसील समोर सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारपासून साखळी उपोषण सुरू केले. पहिल्या दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला असून यावेळी परूषांसह महिलांची ही उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे आदी मागण्यां संदर्भात सकल समाजाच्या वतीने अर्धापूर तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील सर्व गावांच्या सहभागातून होत असलेल्या साखळी उपोषणास पहिल्या दिवशी दि.१८ सप्टेंबर रोजी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. तालुक्यातील धामदरी, डौर, देगाव कु. येथील मराठा समाज बांधवांसह अनेकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
साखळी उपोषणाच्या पहिल्या दिवशी प्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिजाऊ वंदनेने सुरूवात करण्यात आली. यावेळी सावरगाव येथील भजनी मंडळ यांनी आरक्षणावर आधारित गीत , पोवाडे सादर करत आरक्षणाचे महत्व आपल्या गायनातुन मांडले. यावेळी उपोषणासाठी मंडपाची व्यवस्था केल्याबद्दल भागवतराव निरगुडे यांचा सत्कार करण्यात आला. व उपोषण कर्त्या गावातील अमरण उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांच्या सत्कार करण्यात आला. उपोषणास मुस्लिम बांधवांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी अनेक समाजाती समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button