अल रिजवान शाळेची प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करून कर माफी मिळवण्याचा प्रयत्न
नांदेड दि.३०, येथील चैतन्य नगर परिसरात असलेल्या अल रीजवान शाळेद्वारे महानगरपालिकेच्या डोळ्यात धुळफेक करून, आम्ही अल्पसंख्यांक, दरिद्र रेषेखालील गरीब मुलांना शिक्षण देतो त्यामुळे आम्हाला मालमत्ता करातून सूट देण्यात यावी असा प्रयत्न केला जात आहे.वास्तविकपणे अल रिजवान या शाळेमध्ये प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्ग ज्या इमारतीमध्ये भरतात त्या इमारतीचे संस्थाचालक भरमसाठ भाडे घेतात. त्याचबरोबर क्रीडांगणासाठी देखील अतिरिक्त भाडे आकारले जाते. असे असून देखील केवळ आपल्या स्वार्थासाठी अल्पसंख्यांक नाव पुढे करून संबंधित आपले उखळ पांढरे करू इच्छितात.
त्यामुळे प्रशासनाने खरेच या शाळेमध्ये किती अल्पसंख्यांक गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले जाते याची तपासणी करावी अनेक पालकांकडून लाखो रुपये फीस या शाळेकडून घेतल्या जात असल्याचे बोलले जाते. एलकेजी युकेजी या वर्गासाठी 41 हजार एवढे शुल्क घेतल्या जात आहे तर मग वरच्या वर्गाला किती शुल्क घेतले जात असेल याची आपल्याला कल्पना येते. त्यामुळे सदरील शाळेच्या लेख्यांचे परीक्षण व तपासणी करून मालमत्ता करात मागितलेली सूट देण्यात येऊ नये असे विचार समाजातून व्यक्त होत आहेत.