युवक काँग्रेस महासचिव पदी संतोष भुक्तरे यांची निवड
नांदेड दि.११ नांदेड जिल्हा युवक काँग्रेस कमिटीची बैठक नवामोंढा येथील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आज दुपारी घेण्यात आली. या बैठकीत काँग्रेसचे निष्ठावान सक्रीय कार्यकर्ते संतोष नागोराव भुक्तरे यांची युवक काँग्रेस नांदेड जिल्हा महासचिवपदी निवड करण्यात आली.
मागील दहा वर्षापासून सक्रिय आणि निष्ठावान पणे तळागाळातील लोकांपर्यंत काँग्रेस पक्षाची भूमिका पोहोचवण्याचे कार्य संतोष भुक्तरे यांनी केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली.माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या प्रसंगी नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश महासचिव तथा हिंगोलीचे प्रभारी प्रफुल सावंत, महापौर प्रतिनिधी ॲड. निलेश पावडे, युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील कोंढेकर, शहराध्यक्ष डॉ.विठ्ठल पावडे, अतुल पेदेवाड, उत्तर विधानसभा अध्यक्ष विकी राऊतखेडकर,युवक काँग्रेसचेनांदेड तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक प्रतिनिधी श्याम कोकाटे पाटील, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे नगरसेवक संदीप सोनकांबळे सत्यवान पाटील अंभोरे,शिवाजी तातेराव कोकाटे,प्रभू मारुती कोकाटे,गणेश पाटील कोकाटे,सौरभ पाटील कोकाटे,विकास पाटील कोकाटे,राहुल भुक्तरे,विजय भुक्तरे,गजानन पाटील कोकाटे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.