जिला

किनवटचे नगराध्यक्ष आंनद मच्छवारांना जमले नाही ते माहुरचे नगरध्यक्ष फिरोज़ दोसानी यांनी करुण दाखवले,राष्ट्रय महामार्गाचे काम गुण्डाळणयाच्या बेतात कंत्राट दाराला लगाम

किनवट/(अकरम चौहान)- माहूर शहरातील निर्माणाधिन असलेल्या राष्ट्रीय (१६१ ए) महामार्गाची जागा उपलब्ध असेल तशी कामाची गुंडापट्टी करण्यावर कंत्राटदाराने जोर लावल्यानंतर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी रस्तेमंत्री नितीन गडकरींना नागपूर भेटीत १०० फुटाच्या रुंदीकरणाची मागणी केलेल्या पत्राची दखल घेऊन कंत्राटदाराच्या मनमर्जीला लगाम लावला. ते किनवटचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवारांना जमले नाही. मंत्र्यांच्या व नेत्यांच्या हारतुर्‍यांना मच्छेवारांची हजेरी असायची परंतू किनवटमधून १०० फूट रुंदीच्या कामासाठी कधी ठोस पत्रव्यवहार करुन पाठपुरावा केल्याचे उदाहरण कधी समोर आलेले नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. उल्लेखनिय म्हणजे नगरपरिषदेपासून ते दिल्ली दरबारापर्यंत भाजपाचीच सत्ता असतांना सुद्धा. किनवट मधिल महामार्गाच्या १०० शंभर फुटाच्या कामासाठी इच्छाशक्तीचा अभाव प्रखर्षाने जाणवला हे विशेष.
      किनवटमध्येच पैनगंगा अभयारण्याचा पर्यावरण संवेदनशिल क्षेत्राच्या आड कांहीकाळ कामाला ब्रेक दिले. अतिक्रमनधारक असोत वा अधिकृत मालमत्ताधारक असोत, त्यांनी मांडलेल्या समस्यांमुळे रुंदीकरणाला टाच लागली. वनविभागानेही मध्येच गोकुंद्यात आणि किनवटात वनक्षेत्र येत असल्याचा आडवा दांडू टाकल्याने १०० फूट रुंदीकरणाच्या कामात खोडा घातला. ज्यांना ज्यांना ज्या ज्या परी वापरता येतात, त्या त्या परी वापरल्यामुळे रुंदीकरणाच्या इच्छाशक्तीचा प्रत्येय दिसून आल्याने त्याचाच फायदा याच कंत्राटदाराने उचलला. त्यांच्याच मनमर्जीने जमेल ती पद्धत वापरुन कामाची गुंडाळपट्टी चालवली आहे. 
     दरम्यानच्या काळात कांही नेत्यांची भूमिकाच तळ्यात-मळ्यातची दिसून आली. मालमत्ताधारकांना मावेजा देऊन मार्ग काढायला काय हरकत होती ? केंद्रीय मंत्री तर भाजपाचेच असल्यामुळे किनवटातील महामार्गाला अडचण येणार नाही असा विकासप्रेमींचा समज होता परंतू तो निरर्थक ठरला. कारण नगर परिषदेच्या सत्तास्थानीही भाजपाचीच एकहाती सत्ता होती. माहूरमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसची सत्ता असतांना त्यांनी मात्र कंत्राटदाराच्या मर्जीने नाही तर स्वतंत्र पाठपुरावा करुन अपेक्षित विकासाला दिशा दिली, ते किनवटच्यांना का जमले नाही ? असा सवाल निर्माण होणे स्वाभाविक आहे. गोकुंदा आणि किनवटच्या सरहद्दीवरील पुलाच्या ठिकाणी पक्केकाम केलेले नसल्यामुळे दुचाकी घसरुन पडत आहेत. गाड्यांचे नुकसान होत आहे. या बद्धल माध्यमांनी आवाज उठवला पण सासर्‍याचे घर रस्त्यात आले त्यावेळी ते राष्ट्रीय महामार्गाच्या आड आल्याने घीर भूईसपाट केलेल्या केंद्रीयमंत्र्यांपर्यंत तो पोहोचला नसावा म्हणून किनवटातून गेलेल्या महामार्गाचे हे हाल असल्याच्या अनेकांच्या प्रतिक्रिया आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button