श्रीमती नीति सरकार, डीआरएम/नांदेड यांनी हिंगोली आणि बसमत स्टेशनची कामाची पाहणी केली
15 जून 2023 रोजी, श्रीमती नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड विभाग/दक्षिण मध्य रेल्वे यांनी हिंगोली आणि बसमत स्टेशनची पाहणी केली.
सुरुवातीला श्रीमती सरकार यांनी हिंगोली स्थानकाची पाहणी केली. श्रीमती. सरकार यांनी वेटिंग हॉल, सर्क्युलेटिंग एरिया, गुड्स शेड ची पाहणी केली. श्रीमती. सरकारने कर्मचाऱ्यांना स्टेशनवरील स्वच्छता सुधारण्याच्या सूचना दिल्या आहेत. श्रीमती सरकार आणि इतर विभागीय अधिकार्यां नी रिले रूम सहित सुरक्षेच्या विविध बाबी देखील तपासल्या.
हिंगोली रेल्वे स्थानकाचा विकास ‘अमृत भारत स्टेशन स्कीम’ या अंतर्गत करण्यात येणार आहे. डीआरएम मॅडम यांनी हिंगोली स्थानकावर काय आणि कश्या प्रकारे सुविधा पुरविण्यात येवू शकतील या विषयी श्री के. नागभूषण राव, मुख्य प्रोजेक्ट मैनेजर (गती शक्ती), श्री राजेंद्र कुमार मीना, अप्पर रेल्वे व्यवस्थापक, श्री नागेंद्र प्रसाद, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
यानंतर श्रीमती सरकार यांनी बसमत रेल्वे स्थाकाची पाहणी केली. ज्यात त्यांनी सर्व प्रथम गुड्स शेड (माल धक्का) ला भेट दिली. त्या नंतर त्यांनी इतर रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत रिले रूम ची पाहणी केली. स्टेशन वरील इतर प्रवासी सुविधांचा आढावा घेतला. स्वच्छता सुधारण्याच्या सूचना दिल्या.