नांदेड आणि पूर्णा रेल्वे स्थानकावर मोठी तिकीट तपासणी मोहीम, 2.40 लाख रुपये दंड वसूल केला
दिनांक 15.06.23 रोजी श्री रवि तेजा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड यांच्या देखरेखीखाली सकाळी 06.00 ते रात्री 21.00 वाजेपर्यंत हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर येणाऱ्या सर्व प्रवासी गाड्यांचा तपास करण्याकरिता एक विशेष तिकीट तपासणी मोहीम आयोजित करण्यात आली होती.
यात नांदेड रेल्वे स्थानकावर येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या तपासण्यात आल्या. तसेच बस चा वापर करून पाथरड रेल्वे स्थाकावर अचानक धाड टाकण्यात आली. या नंतर सायंकाळी पूर्णा रेल्वे स्थानकावर अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध अचानक तपासणीही करण्यात आली. या मोहिमेत या पथकाने 5 अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली.
या तपासणी मोहिमेत एकूण 25 तिकीट तपासनिसांनी आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. दिनांक 15 जून, या एकाच दिवशी या तिकीट तपासणी मोहिमेत 302 विना तिकीट प्रवासी, 31 अनियमित प्रवासी आणि 12 अनबुकड लगेज मिळून एकूण 345 केसेस बनविण्यात आल्या, आणि 2,40,230/- रुपये दंड वसूल करण्यात आला.
श्रीमती नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी प्रवाशांना आवाहन केले आहे कि प्रवाशांनी योग्य तिकीट घेवूनच प्रवास करावा, अनधिकृत फेरी वाल्यांकडून कोणतेही पदार्थ घेवू नयेत.