जिला
श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी शाळेतील लहान मुला सोबत पहीला दिवस साजरा केला.
15.06.2023 रोजी शाळा सुरू झाल्या व शाळेचा पहील्या दिवसाचे औचित्य साधुन नांदेड पोलीस दलाचे कुटूंब प्रमुख या नात्याने मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी स्नेहनगर पोलीस वसहात येथील शाळेला भेट देवुन शाळेचा पहील्या दिवसा निमीत्ताने विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
नांदेड पोलीस कल्याण विभागातर्फे स्नेहनगर पोलीस बसहात येथे पोलीसांच्या कुटूंबियासाठी व पाल्यासाठी पाळणाघर, बालवाडी, पहिले ते चौथी पर्यंत प्राथमीक शाळा, पोलीस वाचनालय व अभ्यासीका चालवण्यात येतात. शाळेच्या पहील्या दिवसांचे औचित्य साधुन मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी शाळेला भेट दिली. शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृंद यांच्याशी संवाद साधला व हुशार विद्यार्थ्यांना पारितोषीक दिले. तसेच संपूर्ण विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांना फुले देवुन स्वागत केले..
सदर कार्यक्रमास मा. श्रीमती डॉ अश्विीनी जगताप, पोलीस उपअधिक्षक (मु.), श्री नामदेव रिठठे, पोनि पोलीस कल्याण विभाग, श्री विजय धोंडगे, राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय नांदेड, कॉलनी इंचार्ज पोहेकॉ / श्री दर्शन यादव पोलीस मुख्यालय नांदेड व माझी कॉलनी इंजार्ज सेवानृित्त पोहेकॉ / श्री उध्दव घुले, हे हजर होते.