जिला

पर्यावरण दिनानिमीत्त जिल्हा व सत्र न्यायालय नूतन इमारतीच्या प्रांगणात वृक्षारोपण संपन्न

नांदेड  दि. 8 : प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नागेश व्ही. न्हावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वनपरिक्षेत्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा व सत्र न्यायालय नूतन इमारत कौठा नांदेडच्या प्रांगणात 5 जून 2023 रोजी वृक्षारोपण करुन जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज यांची प्रमुख उपस्थीती होती. यावेळी त्यांनी उपस्थितांना पर्यावरणासंबंधी मार्गदर्शन केले. जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावावे व त्याचे संगोपण करावे जेणेकरुन पर्यावरणाचा समतोल राखता येईल असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मुख्य विधी सहाय्य संरक्षण सल्लागार लोकाभिरक्षक अॅड. स्वप्निल कुलकर्णी , उपमुख्य विधी सहाय्य संरक्षण सल्लागार लोकाभिरक्षक अॅड. नय्यूम खान पठाण, विधी सहाय्य संरक्षण सल्लागार लोकाभिरक्षक अॅड. सुरेश कुरोलू , रिटेनर लॉयर अॅड. मंगेश वाघमारे, अॅड.सचिन मगर, अॅड. मनिषा गायकवाड व वनपरीक्षेत्र अधिकारी संदीप शिंदे, उप वनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक भिमसींग ठाकुर व न्यायालयीन कर्मचारी के.जे. भोळे, सुनील चव्हाण आदीची उपस्थिती होती. वृक्षारोपणानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button