आंबेडकरवादी साहित्य संमेलन नांदेड येथे थाटात संपन्न
नांदेड दि.18 सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष , भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि दलित पँथर्सच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सत्यशोधक विचार मंच, नांदेड च्या वतीने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत ‘कास्ट मॅटर’ या ग्रंथाचे लेखक डॉ सुरज यंगडे यांच्या अध्यक्षतेखाली 20 वे आंबेडकरवादी साहित्य संमेलन दलित पँथर सुवर्ण महोत्सव लिटरेचर सिटी, डॉ.शंकरराव चव्हाण सभागृह, स्टेडियम कॉम्प्लेक्स,नांदेड येथे संपन्न झाले.
यावेळी श्री विलास शिंदगीरकर, अर्जुन डांगळे, प्रा दत्ता भगत ,विठ्ठल पाटील डक, मा.आबा भगत, महेंद्र भवरे,श्री मंगेश कदम,कोंडदेव हटकर,राहुल सोनाळे, डॉ. प्रविण कुमार सावंत डॉ. मिलिंद तुळसे, चंद्रकांत कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सत्यशोधक समाजभूषण पुरस्कार 2022 हा विद्यार्थी चळवळीत अनेक वर्षापासून आंबेडकरवादी विचाराने प्रेरित होऊन कार्य करणारे
डाॕ.हर्षवर्धन दवणे (नांदेड) राष्ट्रीय नेते (नसोसवायएफ,विद्यार्थी संघटना) यांना संमेलनाध्यक्ष डॉ.सुरज ऐंगडे, मा.अर्जुन डांगळे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. साहित्य संमेलनात आंबेडकरवादी चळवळ व विद्रोही साहित्य या अनुषंगाने उहापोह करण्यात आला.आंबेडकरवादी विचारवंतांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त विचारवंत डॉ.सुरज एंगडे यांनी अभ्यासपूर्ण आंबेडकरवादी चळवळीची दशा आणि दिशा यावर आपले विचार व्यक्त केले. या साहित्य संमेलन संयोजन समितीचे अध्यक्ष सुरेशभाऊ हटकर हे होते. साहित्य संमेलनाचे सूत्रसंचालन इंजिनियर भीमराव हटकर यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी आंबेडकरवादी जलसा व महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका मंजुषाताई शिंदे यांचा बहारदार गीत गायनाचा विशेष कार्यक्रम ठेवण्यात आला होता ज्यांचा रसिक प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला.