जिला

नांदेड पोलीस दलातर्फे पोलीस उप अधिक्षक यांना निरोप देण्यात आला.

 

पोलीस महासंचालक कार्यालयाकडुन नुकत्याच केलेल्या सर्वसाधरण बदल्या मध्ये नांदेड पोलीस दलातील तीन उपविभागीय पोलीस अधिकारी व दोन पदोन्नतीने बदली झाली आहे. यांना मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांचे हस्ते छोठे खानी कार्यक्रम घेवुन निरोप देण्यात आला.
सदर बदल्यामध्ये मा. डॉ. सिध्देश्वर मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा यांची बदली पैठण संभाजीनगर ग्रामीण मा. श्री सचिन सांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी देगलुर यांची बदली जालना शहर, मा. श्री. विक्रांत गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी धर्माबाद यांची बदली भुसावळ जि. जळगाव व पदोन्नती झालेले प्रशांत देशपांडे, यांची उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली ग्रामीण अनिल चोरमले, उप विभागीय पोलीस अधिकारी म्हणुन अंबाजोगाई येथे बदली झाल्याने या सर्वांचा मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांचे हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व भेट वस्तु देवुन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास मा. श्री. अविनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री. गौहार हुसेन, सहा. पोलीस अधिक्षक नांदेड ग्रामीण, मा. श्री द्वारकादास चिखलीकर, पोनि स्थागुशा, मा. श्री साहेबराव नरवाडे, पोनि पोस्टे विमानतळ मा. श्री. अशोक घोरबांड, पोनि पोस्टे नांदेड ग्रामीण, मा. श्री. सुर्यमोहन बोलमवाड, पोनि पोस्टे भाग्यनगर, मा. श्री. मोहन भोसले, पोनि पोस्टे शिवाजीनगर, मा. श्री ज्ञानोबा देवकत्ते, पोनि पोस्टे इतवारा श्री शिवाजी लष्करे सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी नांदेड तसेच कार्यालयातील इतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार मोठया संख्येने हजर होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा. श्री. द्वारकादास चिखलीकर, पोनि स्थागुशा यांनी केले तर आयोजन पोलीस कल्याणचे पोनि श्री नामदेव रिठठे यांनी केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button