जिला

साप्ताहिक युवा रक्षक चे धर्माबाद येथे लोकार्पण.

       येथील मंजू हॉटेल येथे नुकतेच युवा रक्षक या साप्ताहिकाचे मोठ्या थाटामाटात लोकार्पण झाले आहे.दिनांक 02 मे रोजीच्या आयोजित कार्यक्रमात साप्ताहिक लोकार्पणाच्या निमित्ताने धर्माबाद नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निलम कांबळे,युवा नेते संदीप पाटील कवळे व स्थानिक पत्रकार व मान्यवरांची उपस्थिती होती. या अनुषंगाने युवा रक्षक चे संपादक मो.अ.नाहीद मो.अ. समी यांनी प्रास्ताविकात असे म्हटले की,वर्तमानपत्राची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून लोकशाहीच्या बळकटी साठी लोकशिक्षण व लोकजागृतीचे काम करताना समाजातील दुर्बल घटकांची बाजू व हित हेच ध्येय घेऊन आमचे साप्ताहिक अग्रेसर असेल आणि स्थानिक समस्या शासन दरबारी पोहच करण्याचे कार्य सातत्याने या माध्यमातून होत राहिल अशी ग्वाही दिली.प्रसंगी उद्घाटक व मान्यवरांचे शाल पुष्पहार देवून संपादक नाहीद समी यांनी सत्कार केला.
यावेळी पत्रकार सुधीर येलमे,संजय कदम, सतिश शिंदे, शिवराज गाडीवान, भगवान कांबळे,हकिम सरपंच व उर्दु एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जावेद सर मुख्याधिकारी निलम कांबळे, युवा नेते संदीप पाटील कवळे अदी मान्यवरांनी आजची वर्तमानपत्रे व पत्रकारांची अहम भूमिका यावर प्रकाश टाकणारे मनोगत व्यक्त करत संपादक म.अ.नाहीद समी चे कौतुक केले आणि युवा रक्षक साप्ताहिकाच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. या निमित्ताने गोवा येथील पंजी येथे झालेल्या All India Hopkido Boxing Federation Cup 2023 मध्ये All India 3rd Rank मिळवलेल्या धर्माबादच्या विजेत्यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरुन अल्ताफ साब अध्यक्ष दारलुम,गणेश गिरी शिवसेना, रविंद्र शट्टी राष्ट्रवादी, सौ मीना भद्रे, अभियंता नरेश काटकर, मोहसीन खान,सय्यद बाबर,शेख जमाल,नवीन पाटील, मुबिन लाला, पीएसआय वाडेकर, इम्रान पटेल,जीयाउर रहेमान, वाजीद अली व अन्य नागरिक उपस्थित होते.एकंदरीत या सर्व लोकार्पण कार्यक्रमाचे खुमासदार पद्धतीने सुत्रसंचालन सुधाकर जाधव यांनी केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button