महाराष्ट्रा
25 एप्रिल ला लाईन ब्लॉक मुळे काही गाड्या उशिरा धावणारा
सेलू- ढेंगळी पिंपळगाव-मानवात रोड दरम्यान रेल्वे पटरी चे कार्य करण्याकरिता दिनांक 25 एप्रिल रोजी 5 तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे, यामुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार आहेत, त्या पुढील प्रमाणे –
दिनांक 25 एप्रिल उशिरा धावणाऱ्या गाड्या —
1. गाडी क्रमांक 17617 मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस 135 मिनिटे उशिरा धावेल.
2. गाडी क्रमांक 17630 नांदेड ते पुणे एक्स्प्रेस 50 मिनिटे उशिरा धावेल.
3. गाडी क्रमांक 17661 काचीगुडा-नगरसोल एक्स्प्रेस 190 मिनिटे उशिरा धावेल
4. गाडी क्रमांक 12788 नगरसोल – नरसापूर एक्स्प्रेस 90 मिनिटे उशिरा धावेल.
26 एप्रिल ला उशिरा सुटणारी गाडी :
01. दिनांक 26 एप्रिल ला धर्माबाद येथून सकाळी 04 वाजता सुटणारी 17688 धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस धर्माबाद येथून 60 मिनिटे उशिरा सुटेल.