जिला

नांदेड पोलीस दलातील एक पोलीस अधिकारी, दोन लिपीक व नऊ पोलीस अंमलदार सेवानिवृत्त…

 

नांदेड पोलीस दलातील नांदेड पोलीस दलातील एक पोलीस अधिकारी, दोन लिपीक व नऊ पोलीस अंमलदार यांचा नियत वयोमानानुसार दिनांक 31.03.2023 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्रीमती डॉ अश्विनी जगताप, पोलीस उप अधिक्षक (मु), नांदेड यांचे हस्ते आज दिनांक 31/03/2023 रोजी सर्व सेवानिवृत्तांचा पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ व भेट वस्तु देवुन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी श्री अनिल चोरमुले, पोनि नियंत्रण कक्ष नांदेड, श्री शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी नांदेड, हे हजर होते.
सदर सेवानिवृत्तीचा समारंभ मंथन हॉल पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड येथे पार पडला. सर्व सेवानिवृतांनी आता आपल्या कुटूंबाकडे लक्ष द्यावे व सुखी समाधानाने आनंदी जिवन जगन्याचा सल्ला दिला. सदर सेवानिवृत्त समारंभास ईतर शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार कर्मचारी मोठया संख्येने हजर होते. श्री शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी नांदेड यांनी सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सपोउपनि श्री विठ्ठल कत्ते यांनी केले असुन, मपोकों राखी कसबे, शामका पवार पोलीस कल्याण यांनी कार्यक्रमाचे नियोजन चांगल्या प्रकारे केले.
सेवानिवृत्त… केशव मंगु जाधव, अरूण रामचंद्र जोंधळे, अनंद रामजी नरवाडे, धरमसिंग मुन्ना राठोड, क्रिष्णा मालकु पुरके, चंपत जयराम पवार,

प्रकाश पाईकराव सतिश मनोहर रूद्रावार, विजयकुमार दत्तात्रय गुरूडकर, गणेश नागोराव वाघमारे, बबुराव काशिराम चव्हाण

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button