जिला

भोकर तालुक्यात भाजपाला खिंडार; अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत अंगरवाड बंधूंसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

भोकर – दि. 30 भारतीय जनता पक्षाचे भोकर तालुका सरचिटणीस तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजकुमार अंगरवाड, सरपंच संघटनेचे तालुका उपाध्यक्ष मारोतराव अंगरवाड या दोघा बंधूंसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपाला राम-राम करत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे तालुक्यातील काँग्रेसचे संघटन आणखी बळकट होणार आहे.

नांदेड जिल्हा काँग्रेस पक्ष कार्यालयात गुरुवार दि. 30 मार्च रोजी पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी आ. अमरनाथ राजूरकर,माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, वरिष्ठ उपाध्यक्षा मिनलताई खतगांवकर, श्रावण रॅपणवाड, सुरेंद्र घोडजकर, नामदेवराव आईलवाड, तालुकाध्यक्ष जगदीश पा. भोसीकर, विनोद पा चिंचाळकर, रामचंद्र मुसळे, माधव आमृतवाड, गणेश राठोड यांची उपस्थिती होती.

भोकर तालूका भाजपाचे सरचिटणीस तथा बाजार समितीचे माजी संचालक राजकुमार अंगरवाड व त्यांचे बंधू सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष मारोती अंगरवाड, तंटामुक्तेी समितीचे अध्यक्ष दिलीपराव देशमुख देवठाणकर, ग्रा.पं. सदस्य संजय उदगिरे, व्यंकट बत्तलवाड, अमरसिंग जाधव, बंकट जाधव, ज्ञानेश्वर गोदेवाड, पांडुरंग येदले, प्रेमसिंग जाधव, ओमप्रकाश शिंदे, शाम काळे, अनिल कहाळे, सुरेश बोईनवाड, रामजी राठोड यांच्यासह अनेकांनी काँग्रेसपक्षात प्रवेश केला. यावेळी देगलूरचे तालूकाध्यक्ष बळेगावकर, माजी उपाध्यक्ष प्रितम देशमुख, हरजिंदरसिंघ संधू, राजकमलसिंघ गाडीवाले, रावसाहेब देशमुख देवठाणकर, शिवाजी शिंदे, साहेबराव वाकोडे आदिंची उपस्थिती होती.

भोकरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – अशोकराव चव्हाण
भोकर तालूक्याच्या विकासासाठी अनेक विकास कामे हाती घेऊन पूर्ण करण्यात आली आहेत. यापुढेही भोकर तालूक्याच्या सर्वांगिण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. राजकुमार अंगरवाड व त्यांचे बंधू मारोती अंगरवाडसह अन्य कार्यकर्त्यांनी केलेल्या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाची ताकद आणखी वाढेल असा विश्‍वास माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या पक्षप्रवेश सोहळ्यात व्यक्त केला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button