जिला
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाची उत्कृष्ट कामगीरी, घरातुन निघुन गेलेल्या अल्पवयीन तीन मुलीना शोधुन त्यांना नातेवाईकांचे स्वाधीन केले
उपरोक्त विषयान्वये की, खालील नमुद प्रमाणे पोस्टेला कलम 363 भादवि प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते. सदर गुन्हयाचा समांतर तपास करण्याचे वरिष्ठांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख तथा प्रभारी अधिकारी, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, मा. पोलीस निरीक्षक, व्दारकादास चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षातील महिला पोलीस उप निरीक्षक, प्रियंका आर. आघाव, पोहेकॉ / अच्युत गोविंदराम मोरे, पोकॉ/ एस.बी. बिरमवार यांनी सदर गुन्हयाचा बारकाईने शोध घेऊन पिडीत मुलीना शोधुन काढले आहे.
1) पो.स्टे भाग्यनगर गुरनं 87/2023 कलम 363 भादवि गुन्हयातील पिडीत मुलगी आशा वय 17 वर्ष (नाव बदलेले) हीस मोठी बहिन हिणे अभ्यास कर म्हणुन रागावल्याने रागाच्या भरात हैद्राबाद येथे नातेवाईकाडे निघुन गेलेल्या मुलीचा शोध घेऊन सदर मुलीस तीचे नातेवाईकांचे स्वाधिन केले आहे.
2) पो.स्टे. उमरी गुरनं 113/2017 कलम 363 भा.द.वि. गुन्हयातील पिडीत मुलगी जोती वय 17 वर्ष (नाव बदलेले ) ही तीला आवडणा-या मुलासोबत घरचे लग्न करुन देत नसल्याने इतर मुलासोबत लग्न लावुन देतील या भितीने घरातुन पळुन जाऊन दुरच्या नातेवाईकाकडे राहणा-या मुलीचा सदर पथकाने शोध घेऊन मागील पाच वर्षापासुन प्रलंबित गुन्हयातील पिडीत अल्पवयीन मुलीचा शोध घेवून तीचे नातेवाईकांच्या असलेल्या मुलीला शोधुन तीचे नातेवाईकांचे स्वाधिन केले आहे.
3) पो.स्टे. वजिराबाद गुरनं 526 / 2022 कलम 363 भा. द. वि. गुन्हयातील पिडीत मुलगी श्रीदेवी वय 17 वर्ष (नाव बदलेले) हिला आवडणा-या मुलासोबत लग्न करण्यास घरच्यांचा विरोध असल्याने घरचे नातेवाईक इतर मुलासोबत लग्न लावुन देतील या भितीपोटी घर सोडुन तेलंगना राज्यात नातेवाईकांकडे जाऊन राहणा-या मुलीचा सदर पथकाने कशोसीने शोध घेऊन दोन वर्षापासून प्रलंबित गुन्हयातील मुलीस शोधुन नातेवाईकांचे स्वाधिन केले आहे.
तरी जनतेस कळविण्यात येते की, संशयास्पदरीत्या मूलं/मूली फिरत असताना मिळून आल्यास पोलीस विभागास कळवून सहकार्य करावे असे कळविण्यात आले आहे.