मराठवाडा
18 मार्च ला लाईन ब्लॉक मुळे काही गाड्या उशिरा धावणारा ,
सेलू- ढेंगळी पिंपळगाव-मानवात रोड दरम्यान रेल्वे पटरी चे कार्य करण्याकरिता दिनांक 18 मार्च रोजी 5 तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे, यामुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार आहेत त्या पुढील प्रमाणे –
दिनांक 18 मार्च ला उशिरा धावणाऱ्या गाड्या —-
1. गाडी क्रमांक 17617 मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस 135 मिनिटे उशिरा धावेल.
2. गाडी क्रमांक 17630 नांदेड ते पुणे एक्स्प्रेस 50 मिनिटे उशिरा धावेल.
3. गाडी क्रमांक 17661 काचीगुडा-रोटेगाव एक्स्प्रेस 190 मिनिटे उशिरा धावेल
4. गाडी क्रमांक 12788 नगरसोल – नरसापूर एक्स्प्रेस 90 मिनिटे उशिरा धावेल.
उशिरा सुटणारी गाडी :
01. दिनांक 19 मार्च ला धर्माबाद येथून सकाळी 04 वाजता सुटणारी 17688 धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस धर्माबाद येथून 60 मिनिटे उशिरा सुटेल.