समर्पित भावनेतून केलेली रुग्ण सेवा कायम स्मरणात राहील तहसीलदार सुजित नरहरे
मुदखेड प्रतिनिधी (मोहम्मद हकीम)
कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती ही अटळ असते सामाजिक जाणिवेच्या भूमिकेतून आणि समर्पित भावनेतून ग्रामीण भागात आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप फुगारे यांनी समाजातील सर्व रुग्णांची केलेली अविरत रुग्णसेवा कोरोना काळात केलेले उल्लेखनीय कार्य,व त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण रुग्णालयास मिळालेले कायाकल्प पुरस्कार ,हे तालुका वाशी यांच्या कायम स्मरणात राहतील असे प्रतिपादन तहसीलदार सुजित नरहरे यांनी येथील तहसील कार्यालयात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप फुगारे यांच्या स्वेच्छा निवृत्ती चे औचित्य साधून पत्रकार व महसूल प्रशासनाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना केले.
यावेळी गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे ,नायब तहसीलदार संजय नागमवाड , पं.स.चे विस्तार अधिकारी कैलास गायकवाड ,, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय पाटील कुरे ,शहर प्रमुख सचिन माने पाटील ,युवा नेते कुणाला चौधरी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख अंकुश उर्फ भैया मामीडवार ,युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मुजीब पठाण ,माजी सैनिक सुनील चौदं ते,रामजी पाटील कांजाळकर ,मंडळाधिकारी ह यू म पठाण, तलाठी बालाजी माने ,रामराव वडजे दिलीप येनवळ, विनायक चौधरी, विठ्ठल वलदे अंबादास पाटील मुंगल ईजळीकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून डॉ. दिलीप फुगारे यांनी ग्रामीण रुग्णालयात केलेल्या उल्लेखनीय रुग्णसेवेची सविस्तर भूमिका यावेळी पत्रकार संजय कोलते यांनी विशद केली.
तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकार संजय कोलते, शेख जब्बार ,सिद्धार्थ चौदंते, धम्मदाता कांबळे, साहेबराव हौसरे, शेख शमशुद्दीन, आतिक अहेमद, अब्दुल रजाक, साहेबराव गागलवाड,नामदेव राहे रे, आवेश कुरेशी, यांच्यासह अन्य पत्रकारांनी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप फुगारे, यांच्या स्वेच्छा निवृत्ती बद्दल त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संजय कोलते यांनी केले तर आभार आतिक अहेमद यांनी मानले. कार्यक्रमास शहर व तालुक्यातील अन्य कार्यकर्ते व नागरिक यांची उपस्थिती होती.