मालटेकडी-बरकत कॉम्प्लेक्स रोडवर जड वाहनास असलेली बंदी कायम ठेवणे
नांदेड दि.14 मालटेकडी रेल्वे स्टेशन कडून बरकत कॉम्प्लेक्स देगलूर नाका वाजेगाव या रस्त्यावर जाणारी जड वाहतूक गँन्ट्री टाकून मनपातर्फे बंद करण्यात आली आहे.या रोडवर असलेली जड वाहनास बंदी कायम ठेवण्यात यावी असे निवेदन या भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना दिले आहे.जड वाहतुकीमुळे या रस्त्याची दुरावस्था होत आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होऊन नागरिकांना दम्यासारखे आजारही होत आहेत सदरील परिसरात मोठ्या प्रमाणात शाळा असल्याकारणाने विद्यार्थ्यांची रहदारी ही याच रस्त्याने होत असते त्यामुळे या रस्त्यावर जड वाहनास असलेली बंदी कायम ठेवण्यात यावी या भागात जड वाहन वाहतूक करणारे काही लोक सदरील रस्त्यावर जड वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण जिल्हाधिकारी साहेबांनी नागरिकांच्या जीविताचा विचार करून या रस्त्यावर जड वाहतूक करण्यास असलेली बंदी कायम ठेवावी कारण यापूर्वी देखील या रस्त्यावर जड वाहनांच्या वाहतुकीमुळे अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे त्यामुळे मनपातर्फे बसवण्यात आलेली गँन्ट्री न काढता जड वाहनास या रस्त्यावर प्रवेश देऊ नये. नवीन सुसज्ज ओवर ब्रिज जड वाहना साठी तयार केलेला आहे त्याचाच वापर करून मालटेकडी ओवरबीज मार्गेच जड वाहनांना शहराबाहेर काढण्यात यावे अशी मागणी माजी उपमहापौर मसूद अहमद खान, माजी नगर सेवक सय्यद शेर अली, रहीम अहेमद खान, मिर्झा नासेर बेग, रफिक पठाण, अब्दुल रफिक, शेख फकीर साब, शेख जमील, अब्दुल खादर खुरेशी, शेख जब्बार, शेख हमीद, शेख अब्दुल सत्ताधारी, अब्दुल जब्बार, मो. इकबाल, मो. मुनीर, शेख खदीर, सय्यद कलीम यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी साहेबांकडे केली आहे