जिला
पोलीस आणि पत्रकार यांच्यात समन्वय साधू : श्रीकृष्ण कोकाटे
बाऱ्हाळी प्रकरणात नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट
नांदेड : पोलीस आणि पत्रकार यांच्यातील समन्वय वाढवून त्यांच्या सुसंवाद व्हावा या अनुषंगाने आपण स्वतः लक्ष घालू. ज्या अधिकाऱ्यांकडून पत्रकारांना सापत्न वागणूक देण्यात आली अथवा पत्रकारांसोबत गैरवर्तणूक करण्यात आली अशा अधिकाऱ्यांना समजाऊन सांगू त्यानंतरही जर अधिकारी ऐकलेच नाही तर पुढील कारवाई करू विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आज नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाला दिला.यावेळी स्थागुषाचे पोनी द्वारकादास चिखलीकर यांची उपस्थिती होती.
मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी येथील पत्रकार मंडळी चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने वार्तांकन माहिती मिळविण्यासाठी तेथील पोलीस चौकीत गेले असता उपविभागीय पोलीस अधिकारी आणि एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने पत्रकारांना शिवीगाळ करून त्यांना सापत्न वागणूक दिली. शिवाय दमदाटी करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला होता. या अनुषंगाने नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत आज जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले .
यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गोवर्धन बियाणी , परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस राम तरटे, महानगर अध्यक्ष शिवराज बिच्चेवार, सतीश मोहिते, प्रदीप लोखंडे, योगेश लाठकर, प्रल्हाद कांबळे, प्रल्हाद लोहेकर, राजू कोटलवार, रवी संगनवार ,किरण कुलकर्णी , शेख मुजीब, गजानन कानडे, अर्जुन राठोड, अभिषेक एकबोटे आदींची उपस्थिती होती.