विधान परिषदेच्या निकालावरून आदित्य ठाकरेंचं पुन्हा शिंदे गटाला चॅलेंज, म्हणाले हिंमत असेल तर…
या सर्व पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला पुन्हा एकदा टोला लगावला आहे. नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे? विधान परिषद निवडणूक निकालावरून आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाला जोरदार टोला लगावला आहे. निवडणूक असते हार जीत सुरूच राहाते.
पण हिंमत असेल तर विधानसभा आणि महापालिका निवडणुका घेऊन दाखवा. त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी निवडणुकीला सामोरं जावं. 40 गद्दारांच्या मतदारसंघात निवडणुका घेऊन दाखवा असं थेट चॅलेंजच आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपला दिलं आहे.
आपल्या देशात, आपल्या राज्यात आणि आपल्या मुंबईमध्ये लोकशाही आहे की नाही असा विचार आता मनात येतो. राज्यात देखील हेच सुरू आहे. आपली मुंबई जगभरात ओळखली जाते. मुंबईकर म्हणून आपली ओळख आहे. मात्र त्याच मुंबईमध्ये गेल्या एक वर्षापासून कोणाचीही सत्ता नाहीये, प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक अंदाधूंद कारभार करत आहेत, जनतेच्या पैशांचा चुरडा होत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.