मराठवाडा
परभणी : पाथरी तालुक्यातील दूचाकीवरून रील्स बनवताना दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
पाथरी, ध्वजवंदनासाठी निघालेले विद्यार्थी मोटारसायकलवर रिल्स बनवत असताना समोरून येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले होते. या जखमींपैकी शंतनू सोनवणे याचा गुरुवारी (दि.२६) सकाळी तर स्वप्निल चव्हाण याचा शुक्रवारी (दि.२७) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर दोन गंभीर दोघांना अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पुढील उपचारासाठी दोघांना लातूरला हलवण्यात आले आहे.
पाथरी तालुक्यातील डाकू पिंपरी येथील स्वप्निल ज्ञानेश्वर चव्हाण, योगानंद कैलास घुगे, शंतनु कांचन सोनवणे, राहुल महादेव तिथे है चार विद्यार्थी कानसुर येथील श्री चक्रधर स्वामी विद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेत आहेत. गुरुवारी (दि.25) सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनासाठी दुचाकीवरून ते कानसुर येथील शाळेत डाकु पिंपरी येथून जाण्याकरिता निघाले होते. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास महाविद्यालयापासून एक किमी अंतरावर पाथरी-सोनपेठ या राष्ट्रीय महामार्गावर समोरून येणाऱ्या वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने आषण अपघात झाला.
यावेळी दुचाकीवरील इयत्ता नववीतील स्वप्निल चव्हाण, योगानंद पुगे, शंतनु सोनवणे व राहुल तिथे हे चारही विद्यार्थी रस्त्याच्या कडेला फेकल्या गेले. यात शंतनू सोनवणे याचा गुरुवारी सकाळी रुग्णालयात नेत असताना तर स्वप्नील चव्हाण याचा शुक्रवारी सकाळी ६ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की जखमीमधील एका विद्यार्थ्यांचा हात धडावेगळा झाला असून चारही विद्यार्थी गंभीर जखमी झाले. अपघातात समोरून आलेले अज्ञात वाहन घटनास्थळावरुन निघून गेले होते. घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
रिल्स बनवणे पडले महागात
दरम्यान, या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला व नंतर थोड्याच वेळाने अपघातापूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये हे विद्यार्थी रिल्स बनवताना दिसत आहेत. दुचाकीवर एकाने हातात मोबाईल घेवून व्हिडीओ करण्याच्या प्रयत्नात अपघात झाला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
रोजच्या अॅटोला दिला नकार
सदरील अपघातातील विद्यार्थी डाकू पिंपरी येथून दररोज कानसूर येथे ऑटोने शाळेत जातात. २६ जानेवारी रोजी ऑटोचालक नेहमीप्रमाणे विद्यार्थांना झेंडावंदनाला आणण्यासाठी वेळेत पोहोचला होता. तसेच त्याने या विद्यार्थ्यांची १५ ते २० मिनिटे ऑटोत घेण्यासाठी वाट पाहिली पण त्यांनी ऑटोत येण्यास नकार देत आम्ही मोटरसायकलवर येत आहोत असे सांगितले.
शाळकरी मुलांना मोबाईल आणि मोटारसायकल वापरायला देन हे कीती धोकादायक आहे हे दि 26 जानेवारीला घडलेल्या या घटनेवरुन सर्व पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे
परवा दि 26 जानेवारी सकाळी सात वाजता सगळीकडेच झेंडावंदनास जाण्यासाठी घाई गडबड चालु होती तशीच आमच्या परीसरात असलेल्या श्री चक्रधर स्वामी विद्यालय कानसुर या ठिकाणी झेंडावंदनास जाण्यासाठी डाकुपिंपरी येथील चार शाळकरी विद्यार्थी शाळेच्या गाडीत न जाता मोटारसायकल वर निघाले सोबत अँन्डराईड मोबाईल फोन होता गाडी चालवत असताना व्हिडिओ शुट करण्याच्या नादात व गाडीच्या अमर्याद वेगामुळे समोरुन येणाऱ्या वाहणाला जबरदस्त धडक बसली आणी क्षणात चौघेही रक्तरंजित झाले
धडक येवढी जबरदस्त होती की एका मुलाचा एक हात तुटुन बाजुला गेला एकाचा पाय मोडला दोघे गंभीर जखमी झाले वेळीच अँबुलंस बोलावुन त्यांना दवाखान्यात पाठवण्यात आले परंतु जास्त रक्त प्रवाह झाल्यामुळे त्यातील दोन मुलांची दवाखान्यातच प्राणज्योत मालवली
हा अपघात केवळ मोबाईलचा अतिवापरामुळे व अल्पवयीन मुलांच्या हातात मोटारसायकल वापरायला देणे या दोन गोष्टींमुळे घडली
म्हणून पालकांनीअत्यंत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे