जिला

पोलीस अधिक्षक कार्यालयात घेतली ‘राष्ट्रीय मतदान दिनाची शपथ

मा. भारत निवडणुक आयोगाचे निर्देशानुसार 25 जानेवारी हा दिवस संपुर्ण देशात राष्ट्रीय मतदार दिन म्हणुन साजरा केला जातो. 18 वर्षे पुर्ण केलेल्या नवतरूण मतदारांचा मतदार यादीत समावेश करणे व त्यांचा मतदान प्रक्रीयेत सहभाग वाढविण हा मुख्य उद्देश आहे..
आज दिनांक 25 जानेवारी, 2023 रोजी 11.30 बुधवार या दिवशी मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय मतदान दिनाची शपथ घेण्यात आली. मा. श्री. अशोक अनंत्रे, यांनी शपथेचे वाचन केले त्या पाठोपाठ उपस्थित सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार मंत्रालयीन कर्मचारी यांनी सदर शपथेचे सामुहीक वाचन केले. या प्रसंगी मा. श्री हाणमंत गायकवाड, पोनि नयंत्रण कक्ष नांदेड, श्री शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी नांदेड इतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार आणि मंत्रालयीन कर्मचारी मोठया संख्येने हजर होते. सदर शपथेचे आयोजन सपोउपनि सुर्यभान कागणे, मपोकों शामका पवार जनसंपर्क कार्यालय पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड यांनी केले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button