मराठवाडा
पेडगाव ग्रामपंचायतचा अभिनव उपक्रम…! सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची दररोज होणार हालचाल रजिस्टर मध्ये नोंद
परभणी : येथील पेडगांव ग्रामपंचायतची निवडणूक होऊन एक महिना झाला या कालावधीत पेडगाव ग्रामपंचायतच्या नवीन सरपंच सदस्यनी अनेक कामे प्रभावीपणे हातात घेऊन मार्गी लावले त्यात सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे हालचाल रजिस्टर ग्रामपंचायत निवडणूक झाल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशीपासून पेडगाव ग्रामपंचायतने पेडगाव मधील सर्व शासकिय कार्यलयातील कर्मचाऱ्यांच्या हालचाल रजिस्टरवर नोंदी घ्यायला सुरुवात केली पेडगावात अनेक शासकीय कार्यालय आहेत. त्यामध्ये जि.प. शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, कृषी सहाय्यक कार्यालय, बँका, विद्युत कर्मचारी यासोबतच अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालय व त्याची कर्मचारी कार्यरत आहेत.
या सर्व शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गावातील जनतेला सोयी सुविधा पुरवाव्यात हा त्या मागचा उद्देश आहे या अनुषंगाने पेडगाव ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्या मार्फत दररोज हे हालचाल रजिस्टर प्रत्येक कार्यालयात जाते व तेथील गावकऱ्यांच्या सेवेसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती, अनुपस्थिती व इतर बाबींची नोंद या रजिस्टर मध्ये नोंदणी घेतली जाते या हलचाल रजिस्टरच्या माध्यमातून सर्व नोंद घेऊन हे रजिस्टर एक किंवा दोन ग्रामपंचायत सदस्यांची स्वाक्षरी घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात सर्वसामान्य नागरीकांना पहाण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येते परिणामस्वरूप गावातील प्रत्येक नागरिकाला ग्रामपंचायत मध्ये हे रजिस्टर पाहून लक्षात येते की आज कुठल्या शासकीय कार्यालयात कुठले कर्मचारी कर्तव्यावर हजर आहेत व कुठले कर्मचारी गैरहजर आहे किंवा रजेवर आहेत आणि त्या अनुषंगाने मग त्या कार्यालयात जाऊन आपले काम होऊ शकते का नाही याची माहिती गावकऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयातच या हालचाल रजिस्टरच्या माध्यमातून समजते हे हालचाल रजिस्टर रोज गावातील प्रत्येक शासकीय कार्यालयात जावून नोंद घेत असल्याने त्या त्या कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालयात हजर राहण्याचे बंधन येत आहे.
जर एखादा अधिकारी किंवा कर्मचारी जर आपल्या कार्यालयात वेळेवर हजर झाला नाही किंवा कुठलीही पूर्व सूचना न देता गैरहजर राहिला तर त्याची नोंद या रजिस्टरमध्ये अधिकृतपणे घेतली जाते अशा कर्मचाऱ्यांना एक दोन वेळेस समज देऊन जर त्यांच्याकडून परत परत असेच वर्तन घडत असल्यास त्यावर पुढील कारवाई ग्रामपंचायत कार्यालयामार्फत सबंधित कार्यालयाच्या वरिष्ठांना प्रस्तावित केली जाणार आहे परंतु मागच्या एक महिन्यात असा कुठलाही प्रकार पेडगाव मधील कुठल्याही कार्यालयात घडलं नसल्याने अशा प्रकारची कारवाई करण्याची गरज ग्रामपंचायत कार्यालयाला पडली नाही हे हालचाल रजिस्टर म्हणजे गावातील सर्व शासकीय कार्यालयाची एकत्रित माहिती ठेवणारी नोंदवहीच आहे यामुळे गावातील नागरिकांना सर्व माहिती एका जागेवर उपलब्ध होत असून कर्मचारी व अधिकारी यांनाही एक प्रकारची शिस्त लागण्यास मदत झाली असून गावकऱ्यांना सर्व शासकीय कार्यालयात चांगल्या सुविधा मिळवण्यासाठी या हालचालिस्टची मदत होत आहे तसेच गावातील कार्यालय प्रमुखांना आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी याची मदत होत आहे ग्रामपंचायत पेडगावच्या या उपक्रमाचे गावकऱ्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे