नांदेड-मुंबई-नांदेड मार्गे हिंगोली, वाशीम, अकोला द्वी-साप्ताहिक विशेष गाड्या
दक्षिण मध्य रेल्वे ने प्रवाशांची मागणी लक्षात घेवून नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई -नांदेड मार्गे बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला या द्वि-साप्ताहिक विशेष गाडीच्या 20 फेऱ्या करण्याचे ठरविले आहे. ते पुढील प्रमाणे –
1. गाडी क्रमांक 07426 नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई: हि विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 30 जानेवारी आणि 6, 13, 20 आणि 27 फेब्रुवारी, 2023 ला दर सोमवारी रात्री 21.15 वाजता सुटेल आणि पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे मंगळवारी दुपारी 13.30 वाजता पोहोचेल.
2. गाडी क्रमांक 07427 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – नांदेड : हि विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दिनांक 31 जानेवारी आणि 7, 14, 21 आणि 28 फेब्रुवारी, 2023 ला दर मंगळवारी दुपारी 16.40 वाजता सुटेल आणि कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली, बसमत, पूर्णा मार्गे नांदेड येथे बुधवारी सकाळी 09.30 वाजता पोहोचेल.
3. गाडी क्रमांक 07428 नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई: हि विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 25 जानेवारी आणि 1, 8, 15 आणि 22 फेब्रुवारी, 2023 ला दर बुधवारी रात्री 21.15 वाजता सुटेल आणि पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे गुरुवारी दुपारी 13.30 वाजता पोहोचेल.
4. गाडी क्रमांक 07429 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – नांदेड : हि विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दिनांक 26 जानेवारी आणि 2, 9, 16 आणि 23 फेब्रुवारी, 2023 ला दर गुरुवारी दुपारी 16.55 वाजता सुटेल आणि कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली, बसमत, पूर्णा मार्गे नांदेड येथे शुक्रवारी सकाळी 09.00 वाजता पोहोचेल.
5. या दोन्ही गाड्यांत वातानुकुलीत डब्बे तसेच स्लीपर क्लास चे डब्बे असतील.