राजकारण

21 उमेदवारांचे विधानसभेसाठी अर्ज दाखल लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण तीन अर्ज

नांदेड दि. 24 ऑक्टोबर :- विधानसभा निवडणुकीसाठी आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्यच्या तिसऱ्या दिवशी 18 उमेदवारांनी 20 अर्ज 9 मतदारसंघात दाखल केले आहेत. त्यामुळे 24 ऑक्टोबर पर्यंत 21 उमेदवारांचे 24 अर्ज दाखल झाले आहेत. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी आणखी दोन अर्ज दाखल झाले असून आतापर्यंत एकूण 3 अर्ज दाखल झाले आहेत.

आज राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षाचे तसेच सध्याच्या विधानसभा व विधानपरिषद सदस्य असलेल्यांपैकी 83-किनवट मतदारसंघात एका उमेदवाराने एक नामनिर्देशनपत्र दाखल केले. आतापर्यंत दोन उमेदवारांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. आज अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये भाजपचे आमदार भिमराव रामजी केराम (एबी फॉर्म अप्राप्त) यांचा समावेश आहे. 84-हदगावमध्ये आज कॉग्रेसचे आमदार माधव निवृत्तीराव पवार यांनी अर्ज दाखल केला. 88-लोहा मतदारसंघात आज माजी खासदार प्रतापराव गोविंदराव चिखलीकर यांनी अर्ज दाखल केला.

89-नायगाव येथे भाजपचे आमदार राजेश संभाजीराव पवार यांनी अर्ज दाखल केला. 91-मुखेड येथे कॉग्रेसचे पाटील हनमंतराव व्यंकटराव (एबी फॉर्म अप्राप्त), भाजपचे आमदार तुषार गोविंदराव राठोड (एबी फॉर्म अप्राप्त), शिवसेना उबाठाचे दशरथ मंगाजी लोहबंदे (एबी फॉर्म अप्राप्त) यांनी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय अपक्ष म्हणून भास्कर बालाजी हंबर्डे, संजय शिवाजीराव भोगरे, नय्यर जहा मोहमंद फेरोज हुसेन यांनी 87-नांदेड दक्षिण मधून तर लोहामधून अपक्ष मनोहर बाबाराव धोंडे यांनी अर्ज दाखल केला.

आज दिवसभरात किनवटमधून 14, हदगावमधून 28, भोकरमधून 56, नांदेड उत्तरमध्ये 30, नांदेड दक्षिणमध्ये 18, लोहामध्ये 8, नायगावमध्ये 20, देगलूरमध्ये 37, मुखेडमध्ये 33 असे एकूण 240 अर्ज इच्छूकांनी प्राप्त केले आहेत. आतापर्यंत 1 हजार 68 अर्ज इच्छुकांनी प्राप्त केले आहेत. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज ज्ञानेश्वर बाबूराव कोंडामंगले व रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी अर्ज दाखल केले आहेत. याठिकाणी एकुण 3 अर्ज दाखल झाले आहेत.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button