जिला

पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करु – संदीप काळे

आर्थिक विकास महामंडळ स्थापन पत्रकारांकडून आनंदोत्सव साजरा..!!!

 

 

अर्धापूर ( शेख जुबेर ) संघटनेच्या मागणी नुसार पत्रकारांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पेढे वाटून व फटाक्याची आतषबाजी करून व्हॉईस ऑफ मीडिया च्या अर्धापूर टीमने आनंदोत्सव साजरा केला. यावेळी अर्धापूर शहरात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या हस्ते शाखा फलकाचे अनावरण मोठ्या थाटात करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

व्हॉइस ऑफ मीडियाच्या अर्धापूर तालुका शाखा फलकाचे उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटक संस्थापक अध्यक्ष व्हॉईस ऑफ मीडियाचे संदीप काळे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष विजय चोरडिया, प्रदेश सह सरचिटणीस श्रीनिवास भोसले, नांदेड जिल्हाध्यक्ष गणेश जोशी, नांदेड महानगर अध्यक्ष नागोराव पाटील भांगे, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, माजी उपनगराध्यक्ष राजेश्वर शेटे, गटनेते बाबुराव लंगडे,माहात्मा बसवेश्वर संस्थेचे सचिव पंडितराव लंगडे, शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पत्रकारांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पेढे वाटून व फटाक्याची आतषबाजी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

पत्रकारांचे प्रश्न समस्या मार्गी लावण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाकडून सतत पाठपुरावा होत आहे या पाठपुराव्यांना यशही येत आहे. आगामी काळातही पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी तत्पर राहणार असे वक्तव्य यावेळी बोलतांना संदीप काळे यांनी केले. सूत्रसंचालन रामराव भालेराव यांनी केले. यावेळी माजी सभापती गोविंद गोदरे महाराज, योगेश हाळदे, रामराव भालेराव,संजय जतकर, सय्यद युनूस, तालुकाध्यक्ष गोविंद टेकाळे, इरफान पठाण छगनराव इंगळे, शेख साबेर, दिगंबर मोळके, अनिल मोळके, शेख जुबेर,शिवहार घोडेकर
आदी मान्यवर उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button