Uncategorized

नवीन मालमत्ता कर आकारणी बंद केल्याने नवीन मालमत्ता धारकांची आडवणुक, विभागीय आयुक्तांना एमडीओ संघटनेचे निवेदन

परभणी : परभणी महापालिकेस मिळणाऱ्या उत्पन्नातून पालिकेचा सर्व कारभार चालतो परंतू आयुक्त तथा अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशाने शहरातील गुंठेवारी भूखंडाची नवीन घरपट्टी कर आकारणी लावणे मागील आठ महिन्यापासून बंद केल्यामुळे मनपाला येणारे उत्पन्न धावले यामुळे मनपा कर्मचार्यांचे वेतन थकीत झाले  मिळणारे उत्पन्न बंद करून येथील नागरीकांना वेठीस धरण्याचे काम सुरू असल्याची तक्रार विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे मायनाॅरेटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली महानगर पालीका ड” दर्जाची असून शहरातील नगरी सुविधा न देता घरपट्टी व पाणीपट्टीत कर आकारणीत दुप्पटीने वाढ केली जात आहे तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात येणारे उत्पन्नाचे साधन वाढवण्याचा उपक्रम राबवल्या जात नसताना आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांच्या कॅबिनच्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च होतात परंतु शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत असताना त्यासाठी निधी उपलब्ध नाही,
शहरात अनेक ठिकाणी गोरगरीब नागरिक रहातात त्या ठिकाणी गुंठेवारी भूखंडाची जागा जास्त प्रमाणात असल्याने मालमत्ता धारक मुळ मालकाकडून सर्व अधिकार करारनामा करून देण्यात येते परंतु खरेदीखत करून फेरफार हस्तांतरण करण्या ऐवढा बोजा सामान्य माणूस कसा झेपणार असा प्रश्न ? उपस्थित होत आहे नियमितपणे सुरू असललेली नविन घरपट्टी मालमत्ता कर आकारणी देणे बंद कशासाठी करण्यात आली याचा खुलासा मागविण्यात यावा कारण महापालिकेच्या मालमत्ता कर आकारणी तुन उत्पन्नाच्या साधनांमुळे शहरातील विकास कामांना गती देण्यास मदत होते या बाबींना नाकारता येत नाही महानगर पालिका अस्तित्वात आल्यापासून मालमत्ता कर तिन्ही विभागाची जबाबदारी  एकाच कर अधिक्षकांना दिल्याने  वेळेत काम होत नसल्यानचे हजारो अर्ज प्रलंबित आहेत करिता प्रभाग समिती निहाय तिन्ही प्रभागात स्वतंत्र कर अधिक्षक सह दोन कर निरीक्षक शासन निर्णय नुसार देण्यात यावे तसेच शासन निर्णय नुसार आकृतीबंध आराखडानुसार सेवा जेष्ठता व शैक्षणिक अहर्तानुसार पदोन्नती न देता सरळ भरती करून पात्र कर्मचाऱ्यांना डावलून प्रशासकीय अनुभव,शैक्षणिक अहर्ता नसताना महत्वाच्या पदावर नियुक्ती कशी देण्यात आले याची विषयी चौकशी करून पात्र कर्मचाऱ्यांना नियमानुसार महत्वाच्या पदावर नियुक्तीचे आदेश देण्यात यावे,
प्रभाग समिती नुसार नविन मालमत्ता आकारणी, नावांची दुरुस्ती,फेरफार, हस्तांतरण करण्यासाठी ऑनलाईन संगणक व दोन ऑपरेटरची सेवा सुविधा प्रभाग समिती मध्ये स्वतंत्र उपलब्ध करून द्यावी जेणेकरून नागरिकांची होणारी गैरसोयी दूर होईल शहरातील सलामेरिया परिसरातील नवीन कर आकारणी साठी हजारो अर्ज कार्यालयात आठ महिन्यापासून प्रलंबित आहेत घरपट्टी लागू नसल्यामुळे गोरगरीब नागरिकाना घरकुल योजनांचा लाभ घेता येत नसल्याने महत्वाच्या योजने पासून वंचित राहावे लागत आहे या सर्व बाबींचा विचार करून विभागीय आयुक्तांनी याकडे लक्ष देऊन तात्काळ नवीन घरपट्टी, मालमत्ता कर आकारणी सुरू करण्याचे मनपा प्रशासनाला आदेशीत करावेत अशी मागणी मायनाॅरेटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सय्यद रफिक पेडगावकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे अन्यथा या विषयी लोकशाही मार्गाने संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा पण दिला आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button