भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून शुभेच्छा संदेश
नांदेड दि. 15 ऑगस्ट:- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य शासकीय समारंभात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यसैनिक व विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत सकाळी 9.05 वाजता हर्षोल्हासात त्यांनी ध्वजवंदन केले. यावेळी जिल्हावासियांना त्यांनी शुभेच्छा दिल्या तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कार्यासाठी अनेकांना पुरस्कार बहाल केले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज धुळे येथे ध्वजवंदन केले. तथापि, स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर नांदेड जिल्ह्यातील तमाम नागरिकांना त्यांनी शुभेच्छा संदेश दिला आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय मधील या सोहळ्याला आज ध्वजवंदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याचे 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या समारंभास विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
ध्वजवंदनानंतर सलामी देण्यात आली. परेड कमांडर पोलीस निरीक्षक अविनाश धोंडगे यांनी सलामी पथकाचे नेतृत्व केले. पोलीस दलाच्या सलामीनंतर राष्ट्रगीत, राज्यगीत नंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी उपस्थित मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटूंबिय यांची त्यांनी आस्थेने विचारपूस केली. वीरमाता, वीरभगीनी यांच्यासह या विशेष कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांना भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, माजी विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार बी.आर. देशमुख, माजी आमदार गंगाधर पटणे आणि स्वातंत्र्य सैनिकांचे वारस आदीची उपस्थिती होती.
विशेष कामगिरीचा गौरवहैद्राबाद इनामे व रोख अनुदान रद्द करण्याबाबत अधिनियम 1954 मधील तरतुदी व शासन राजपत्रानुसार गठीत करण्यात आलेल्या अभ्यास समितीचे सदस्य म्हणून अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी काम केले. याबाबत अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, साऊथ आफ्रिका येथील मॅरेथान स्पर्धेत सहभाग नोंदवून विहित वेळेत अंतर पूर्ण केल्याबाबत उपजिल्हाधिकारी रोहयोचे ललीतकुमार वऱ्हाडे यांचा गौरव करण्यात आला. लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत विहित कालमर्यादेत काम करणाऱ्या अर्धापूरचे नायब तहसिलदार शिवाजी बाळाजी जोगदंड यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.
पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कर्तव्य बजावलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांना विशेष सेवा पदक जाहिर केले. याबाबत पोलीस उप निरीक्षक सागर सुभाषराव झाडे, वैशाली निवृत्ती कांबळे, नारायण मारोती शिंदे, प्रियंका पवार, राजेश मारोती नंद, निजाम मुसा सय्यद, नरेश केशव वाडेवाले, सचिन मुकुंदराव आरमळ, उमेश किसनराव कदम, पोलीस नायक आशिष प्रभु माने यांना पुरस्कार प्रदान केले.
जिल्हा युवा पुरस्काराचे वितरण यावेळी जिल्हा युवा पुरस्कार 2020-21 मध्ये युवक गटात खान इमरान मुजीब पाशा रा. बिलोली जि. नांदेड यांना 10 हजार रुपयांचा धनादेश व जिल्हा युवा पुरस्कार 2021-22 युवक यामध्ये अमोल उध्दवराव सरोदे यांचा रोख रक्कम 10 हजार रुपयांचा धनादेश व शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देवून सत्कार केला. संस्था या गटात अल इम्रान प्रतिष्ठान, बिलोली, जि. नांदेड यांना रोख रक्कम 50 हजार रुपये आणि जिल्हा युवा पुरस्कार 2022-23 युवक या गटात अमरदीप दिगंबर गोधने हाडको नवीन नांदेड यांना रोख रक्कम 10 हजार रुपयांचा धनादेश व शाल, श्रीफळ व सन्माचिन्ह, सन्मानपत्र देवून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी सन 2023 सीबीएसई विभाग इयत्ता पाचवीतील 5 विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले. यात शाश्वत संतोष केसराळे, नागार्जुना पब्लिक स्कूल, कौठा, पार्थ लिंगेश्वर सोनटक्के, नारायणा ई-टेक्नो स्कूल वाडी, बु नांदेड, सोहम उत्तम मोरे, ग्यानमाता विद्या विहार कामठा रोड, नरसतपूर, प्रज्वल सुंदर धवन, पोदार इंटरनॅशनल स्कूल, पूर्णा रोड नांदेड, सान्वी बाबाराव दारकू, ग्यानमाता विद्या विहार कामठा रोड, नरसतपूर यांचा समावेश आहे. याशिवाय पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी सन 2023 मध्ये ग्रामीणमध्ये शाकुंतल फॉर एक्सलंसचा मारोती शिवराज कुरुंदकर, ज्ञानभारती विद्या मंदिर पुयनीचा अद्वैत नरहरी भोसले, समृध्दी नागनाथ भुरे, कल्याण पद्यनजय कोनाळे यांना तर माध्यमिक शहरी विभागातून राजर्षी शाहू विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज, वसंत नगर, नांदेडचा दयासागर गंगाधर चिंचणे, केंब्रिज माध्यमिक विद्यालय, शिवाजीनगर, नांदेडचा श्रीयश रावसाहेब झांबरे यांचा सत्कार करण्यात आला.
याशिवाय पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सीबीएसई विभाग आठवीचे ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल वाडी बु. नांदेड येथील प्राची पंढरीनाथ जाधव, नागार्जुना पब्लिक स्कूल, कौठा येथील विघ्नेश बालाजी राजे, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल वाडी बु. नांदेड ओमसाई धर्मवीर ठाकूर, नागार्जुना पब्लिक स्कूल, कौठा मयुरेश उमाकांत वाग्शेट्टे, अभिजीत संतोष मोरे, दिव्या राम अनकाडे, शाकुंतल फॉर एक्सलंस अथर्व संग्राम झुपडे, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल वाडी बु. नांदेड स्नेहा देविदास जमदाडे, श्रेयस प्रभू दुगाळे पाटील, पिनॅकल इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल काकांडी तर्फे पासदगाव सोहम निलेश कोटगिरे, शाकुंतल फॉर एक्सलन्स रोहन गोविंद कौसल्ये, पिनॅकल इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल काकांडी तर्फे पासदगाव श्रुतिका गोविंद येळगे, नागार्जुना पब्लिक स्कूल, कौठा श्रीकर विक्रम महुरकर, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल वाडी बु. नांदेड सोहम गंगाधर मंत्रे, श्रीकांत शिवाजी मिरासे, पोदार इंटरनॅशनल स्कूल पूर्णा रोड तनिष्क दिनेशकुमार धुत यांचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. यानंतर नांदेड येथील अवयवदान केलेल्या ढोके यांच्या परिवाराचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी व अक्षय रोडे यांनी केले.