जिला
देगलूर येथील अतिक्रमण केलेली जमीन परत देऊन न्याय देण्या ची मागणी
नांदेड दि 12 श्रीमती महादाबाई चांदु श्रीरामे रा. जनता कॉलनी हिमायतनगर जि.नांदेड यांच्या देगलूर येथील जमिनीवर बाबू धुम्मा राठोड यांनी ग्रामसेवक उमाकांत पंडगे यांच्या संगनमताने जमिनीवर अतिक्रमण केले आहे. अतिक्रमित केलेली जमीन मला माझ्या ताब्यात देऊन न्याय देण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे महादाबाई श्रीरामे यांनी केली आहे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सखोल चौकशी करून सदर तक्रारी बाबत आपला अहवाल सादर करावा असा आदेश दिलेला असताना देखील संबंधित त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करून माझ्यावर अन्याय करत आहेत अशी व्यथा माहदाबाई श्रीरामे यांनी मांडली आहे सदर जमिनी बाबत मूळ दस्त लेख माझ्याकडे असताना देखील संबंधित बाबू राठोड व ग्रामसेवक माझ्यावर अन्याय करत आहेत अशी व्यथा त्यांनी मांडली