जिला

पोलीस स्थापना दिवस ( रेझींग डे) चे औचीत्य साधुन हरवलेले मोबाईल संबंधीतास परत

मा. श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. अविनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. चंद्रसेन देशमुख उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग, नांदेड शहर यांनी सायबर विभागचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना नांदेड शहरामध्ये हरवलेल्या मोबाईलचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या होत्या.
सदर सुचनेच्या अनुषंगाने श्री. चंद्रसेन देशमुख, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग,
नांदेड शहर यांनी श्री. जगदीश भंडरवार, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड व सायबर
विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. उबाळे यांना नांदेड शहरातील हरवलेल्या मोबाईल क्रमांकाची माहीती
घेऊन ते तात्काळ शोधून काढण्याच्या सुचना दिल्या.
सायबर विभागाचे पो.नि. श्री. उबाळे, सपोनि श्री थोरवे, पोउपनि श्री. दळवी, पोलीस अंमलदार राजु सिटीकर, दिपक ओढणे यांनी एकुण (27) मोबाईल क्रमांकाची माहीती तांत्रीक पध्दतीने हस्तगत केली. मा. श्री. चंद्रसेन देशमुख, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग, नांदेड शहर यांनी सदरचे मोबाईल शोधुन काढण्याची जबाबदारी वजीराबाद गुन्हे शोध पथकाकडे सोपविली.
वजीराबाद गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी श्री संजय निलपत्रेवार, सहा पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार पोहेकॉ गजानन किडे, पोना शरदचंद्र चावरे, विजयकुमार नंदे, मनोज परदेशी, संतोष बेलुरोड, व्यंकट गंगुलवार, बालाजी कदम, रमेश सूर्यवंशी, शेख ईम्रान शेख एजाज यांनी सदरचे मोबाईल फोन धारकांचा शोध घेउन त्यांचेकडुन एकुण (27) मोबाईल फोन हस्तगत केले.
हस्तगत करण्यात आलेले (27) मोबाईल फोन हे पोलीस स्थापना दिन ( रेझींग डे) चे औचीत्य साधुन ते सबंधीतांना परत करण्याचा मानस ठेऊन आज रोजी मा. पोलीस अधिक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे, मा. श्री. अविनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. श्री. चंद्रसेन देशमुख उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग, नांदेड शहर यांचे हस्ते 01. गणपत गंगाधर फेदनळे रा. कैलास नगर नांदेड.02. नागनाथ गंगाधर घगे, रा. पारडी ता.किनवट जि.लातुर, 03. अभय रोहीदास जाधव, सोमठाणा ता.वसमत जि. हिंगोली. 04 शिवमाला अजयकुमार सुगावे, रा. फरांदेनगर नांदेड.05 वर्षो अनंद मोरे, रा. आंबेडकरनगर नांदेड.06. निहाल अनिल अटकोरे, रा. आंबेडकर नांदेड. 07. मनोज लक्ष्मणराव चव्हाण, रा. दत्तनगर नांदेड.08.किरण माधवराव मामीडवार, रा. जुनामोठा नांदेड.09. जब अरफात मुल्ला रा. नवी आबादी नांदेड. 10. सोनाली अभय सुवर्णकार रा. काबरानगर नांदेड. 11. निलेश चंद्रकांत डोके, रा. समतानगर नांदेड. 12. प्रतिक गणेशराव देवसरकर, रा. नांदेड. 13. आरती संदिप भाकरे, रा. वरकवाडी नांदेड. 14. उज्वला मिलींद लोणे, रा. लेबर कॉलनी नांदेड यांना मोबाईल फोन परत करण्यात आले आहेत.
वरप्रमाणे केलेल्या कारवाई बाबत वरीष्ठांनी वजीराबाद गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button