जिला

नांदेड पोलीस दलातील पोलीस अधिकारी, व पोलीस अंमलदार सेवानिवृत्त…

 

नांदेड पोलीस दलातील एक पोलीस निरीक्षक, दोन ग्रेड पोलीस उप-निरीक्षक व नऊ पोलीस अंमलदार असे एकुण बारा जण नियत वयोमानानुसार दिनांक 31.05.2024 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री आबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्रीमती डॉ. अश्विनी जगताप, पोलीस उप-अधीक्षक (मु), हस्ते आज दिनांक 31/05/2024 रोजी सर्व सेवानिवृत्तांचा पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ व भेट वस्तु देवुन सत्कार करण्यात आला.

 

सर्व सेवानिवृतानी आपल्या कुटूंबाकडे वेळ द्यावा आणि आरोग्यांची काळजी घेवुन सुखी आणि आनंदी जिवन जगण्याचा सल्ला दिला. सदर कार्यक्रम मंथन हॉल पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड येथे पार पडला. सदर सेवानिवृत्त समारंभास. मा. श्री आबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्रीमती डॉ. अश्विनी जगताप, पोलीस उप-अधिक्षक (मु), श्री नामदेव रिठठे, पोनि कल्याण, इतर पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने हजर होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सपोउपनि श्री विठ्ठल कत्ते. यांनी केले असुन, मपोकॉ राखी कसबे, पोलीस कल्याण यांनी कार्यक्रमाचे आयोजन उत्तम प्रकारे केले आहे.

 

सेविनिवृत्त अंमलदाराचे नाव

गणेश माणिकराव सोंडारे पोलीस निरीक्षक,  ग्रेडपोउपनि रामप्रभु दगडु राठोड,  ग्रेडपोउपनि मनोहर भगवाना जाधव, सपोउपनि अंकुश धनाजी लुंगारे सपोउपनि,  रावसाहेब शेषेराव घुगे, सपोउपनि, विनायक मुगाजी पवार सपोउपनि, नंदकुमार मारोतराव पतंगे, पोहेकॉ सुभाष बाजीराव बनसोडे, पोहेकॉ भगवानसिंग नरसिंग ठाकुर, पोहेकॉ पोहेकॉ, दशरथ बुडगीराम काळे रामरेडी भिमरेडी अलंगेकर, पोकॉ सुर्यकांत विश्वनाथ खेडकर

 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button