पुणे महानगरपालिका येथे तृतीयपंथीवर झालेला हल्ल्याचं तीव्र निषेध करत नांदेड येथील तृतीयपंथी समुदाय कडून जिल्हाधिकारी यांना निवेदन
24 एप्रिल 2024 रोजी पुणे महानगरपालिकेच्या आवारामध्ये सुरक्षा कर्मी असलेले दोन तृतीयपंथी कर्मचारी यांना पुणे नगरपालिका येथे कार्यरत असलेले उपअभियंता ललित बोडे यांच्याकडून पारलिंगी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर मारहाण करण्यात आली. सदरील घटनेचा निषेध दर्शवत तृतीयपंथी कल्याण मंडळ सदस्य डॉ सान्वी जेठवाणी व त्यांच्यासोबत फरीदा शहानुर बकश व अमरदीप गोधने यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पुणे महानगरपालिका चे आयुक्त यांना नांदेड येथील जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले.
सदरील निवेदनात पारलिंगी सुरक्षकांवर झालेले अन्याय तात्काळ लक्षात घेता संबंधित अधिकाऱ्यास कायमस्वरूपी निलंबन करण्याचे निवेदन करण्यात आले असून भारतीय दंड विधान संहिता कलम 353 व तृतीयपंथी सुरक्षा कायदा 2019 अंतर्गत कलम 18 अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या निवेदना मधून करण्यात आली. यासोबत पारलिंगी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निवारणासाठी एक स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा प्रत्येक जिल्ह्यामध्ये असावं त्यात प्रामुख्याने पारेलिंगी समुदायाचे प्रतिनिधी असतील तर योग्य कार्यवाही करण्यासाठी मदत होईल व भविष्यात अशा प्रकारचे गैरवर्तन कोणत्याही पार्लिंगी व्यक्ती समुदाय सोबत होऊ नये यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जेंडर सीन्सिटिझेशनचे कार्यशाळा आयोजित करण्यात यावे अशा विविध मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या.