जिला

आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी लग्न मंडपासमोर अज्ञातांनी त्यांच्या गाडीची ही तोडफोड केली

नांदेड- नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांची गाडी फोडण्यात आल्याची घटना आज घडली आहे. नांदेड शहरापासून जवळच असलेल्या देगाव कुऱ्हाडे येथे ही तोडफोड करण्यात आली आहे. परंतु है जे सुरु आहे ते चुकीचे असल्याची प्रतिक्रिया आमदार कल्याणकर यांनी  व्यक्त केली आहे.

आमदार कल्याणकर है देगाव कुराडे येथे एका लग्न समारंभासाठी आज रविवार दि. १७ मार्च रोजी दुपारी गेले होते. यावेळी त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. हा प्रकार दुपारी साडेबाराच्या सुमारास देगाव कुराडे येथे घडला. येथील ग्रामपंचायत सदस्य विश्वंभर कदम यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी आमदार बालाजी कल्याणकर हे गेले होते.

लग्न मंडपासमोर अज्ञातांनी त्यांच्या गाडीची ही तोडफोड केली. यात गाडीची मागची काच फोडून टाकण्यात आली आहे. गाडी फोडणारे नेमके कोण आहेत? याचा पोलीस शोध घेत आहेत. आमदार कल्याणकर यांनी शिवसेना सोडून सुरत गाठले होते. तेव्हाही त्यांना नांदेडमध्ये मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, घटनास्थळाला नांदेड ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी जॉन वेन, अर्धापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी भेट दिली आहे.

आमदार बालाजी कल्याणकर यांनी याबाबत बोलताना सांगितले की, या समाज भावना आहेत. त्याला आपण काही करू शकत नाही. परंतु है जे सुरु आहे ते चुकीचे आहे. आता लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तर अवघड होणार असल्याची प्रतिक्रिया आमदार कल्याणकर यांनी “गोदातीर समाचार” शी बोलताना व्यक्त केली आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button