जिला
ॲड.संदीप कांबळे यांची केंद्रीय नोटरी अधिकारीपदी निवड
माहुर दि.14 माहूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड.संदीप शंकरराव कांबळे यांची नुकतीच केंद्रीय नोटरी अधिकारी पदीनिवड करण्यात आली आहे.ॲड.कांबळे हे मागील अनेक वर्षा पासून किनवट-माहूर न्यायालयामध्ये वकील म्हणून कार्यरत आहेत. ते एक मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून न्यायालयामध्ये ओळखले जातात. 14 मार्च रोजी विधी व न्याय मंत्रालय नवी दिल्ली नोटरी सेलच्या सचिवांद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये त्यांची केंद्रीय नोटरी अधिकारीपदी निवड झाली आहे. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे माजी न्यायालयीन अधीक्षक एस.एस.भंडारे,सुरेश थोरात, राहुल भुक्तरे,डॉ.बाबासाहेब भुक्तरे,विजय कांबळे, हर्षवर्धन भुक्तरे बुद्धरत्न गोवंदे,अमोल गोंवदे,दिनेश कांबळे,प्रदीप गोवंदे यांनी अभिनंदन केले आहे.