जिल्हा परिषदेच्या सन 2024-2025 मागील वर्षीच्या मूळ अर्थसंकल्पा सदर
आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नाच्या सन 2023-2024 च्या सुधारित तर सन 2024-2025 च्या मूळ अर्थसंकल्पास मा मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मिनल करनवाल मॅडम यांनी मान्यता प्रदान केली
जिल्हा परिषदेच्या सन 2024-2025 ची अपेक्षित जमा 22 कोटी 36 लक्ष तर अपेक्षित खर्च 22 कोटी 31
लक्ष असून सदर अर्थसंकल्प 5 लक्ष 16 हजार रुपये शिल्लकेचा आहे. मागील वर्षीच्या मूळ अर्थसंकल्पापेक्षा सदर अर्थसंकल्प 3 कोटी 17 लक्षने वाढीव आहे. अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात शिक्षण विभागासाठी 1 कोटी 12 लक्षची तरतूद करण्यात आली असून शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी किचनओटे बांधणीकरिता 27 लक्ष तरतूद तर डिजीटल माध्यामातून शिक्षण देण्यासाठी 15 लक्षची तरतूद करण्यात आली आहे तसेच विदयार्थ्यांना वाचन प्रेरणा देण्यासाठी ग्रंथ खरेदी करिता 10 लक्ष रुपये तरतूद करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात होणारे श्वानदंश व साप चावून होणारे मृत्यू रोखण्यासाठी आवश्यक इंजेक्शन करिता 20 लक्ष रुपये तरतूद तर मेडीकल वेस्ट मधून होणा-या प्रदुशणाचा अटकाव करण्यासाठी 62 लक्ष तरतूद करण्यात आली आहे
अनुसूचीत जाती जमाती दुर्बल घटक कल्याणाकरिता 1 कोटी 56 लक्ष ची भरीव तरतूद करण्यात आली असून, यातून विदयार्थ्यांना सायकल पुरविणे, लाभार्थ्यांना मिरची कांडप । गिरणी पुरविणे, गरजूंना गाय, म्हैस पुरविणे, उदरनिर्वाहासाठी फिरते स्टॉल, झेरॉक्स मशिन पुरविणे, मागास वर्गीय विदयार्थ्यांना स्पर्धा परिक्षासाठी प्रोत्साहनपर अनुदान, समाज मंदिर आदिसाठी वरिल तरतूद करण्यात आली असून दिव्यांग कल्याणासाठी 1.11 कोटीची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे
महिला व बालकल्याण विभागाकरिता 96 लक्षची तरतूद करण्यात आली आहे, अंगणवाडींना भांडी पुरविणे 20 लक्ष रुपये अंगणवाडी बालकांना गणवेश पुरविणे, 20 लक्ष कराटे प्रशिक्षण व मोटार ड्रायव्हिंग प्रशिक्षणासाठी प्रत्येकी 8 लक्ष तसेच महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करण्यासाठी अनुदान तत्वावर ई रिक्षा पुरविण्यात येणार असून यासाठी 10 लक्षची तरतूद करण्यात आली आहे
कृषीविषयक कार्यक्रमासाठी 1 कोटी 20 लक्षची तरतूद करण्यात आली असून, शेतीविषयक सुक्ष्म प्रक्रीया उदयोग उभाररणीकरिता 25 लक्ष तर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाकरिता 10 लक्ष रुपये, सिंचन क्षमतेत वाढ होण्यासाठी सिंचन साहित्य पुरविण्यासाठी 12 लक्ष ची तरतूद करण्यात आली आहे तसेच पशुसंवर्धन विभागासाठी 96 लक्षची तरतूद करण्यात आली आहे तर लहान पाटबंधारे विभागासाठी 32 लक्ष ची तरतूद करण्यात आली असून यातून गाळ काढणे, बंधारा बांधणे, आदि योजना राबविण्यात येणार आहेत