Uncategorized

पोलीस ठाणे ईतवारा, नांदेड येथील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणल्याची कार्यवाही.

 

मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब, पोलीस अधीक्षक यांनी चोरी घरफोडी चे गुन्हे उघडकीस आणणे व गुन्हयांना प्रतिबंधक करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे अधिकारी व अंमलदार यांना आदेशीत केले होते.

मा. पोलीस अधीक्षक मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री अबिनाशकुमार साहेब, उप विभागिय पोलीस अधिकारी श्री सुशिलकुमार नायक साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री रणजित भोईटे, पोउपनि श्री आर.बी. चौधरी यांनी पो.स्टे. ईतवारा गुरनं. 49/2024 कलम 457,380 भादेवी गुन्हयात अज्ञात असलेले आरोपी 1 राजु पिता श्रावण पवार वय 23 वर्षे, व्यवसाय टाईल्सकाम राहणारा ब्रम्हपुरी चौफाळा नांदेड 2. शेख समीर पिता शेख चाँद, वय 23 वर्षे, व्यवसाय मजुरी राहणार वाजेगांव ता. जि. नांदेड याना ताब्यात घेवुन अटक करुन मा. न्यायालयाकडुन पोलीस कोठडी घेण्यात आली. अटक आरोपींकडुन गुन्हयातील गेला मालापैकी मालापैकी सोन्याचे शॉर्ट गंठन, सोन्याची अंगठी व चांदीचे चैन जोड दोन नग असा एकूण 50,000/- रुपयाचा ऐवज हस्तगत केला आहे व गुन्हा उघडकीस आणला आहे. अटक आरोपीचा साथीदार आरोपी सय्यद अरिफ सय्यद फारुख रा. गाडीपुरा नांदेड हा निष्पन्न केला आहे.

तसेच पो.स्टे.ईतवारा गुरनं. 29/2024 कलम 457,380 भादवी गुन्हयात अटक आरोपी राजु पिता श्रावण पवार वय 23 वर्षे, व्यवसाय टाईल्सकाम राहणारा ब्रम्हपुरी चौफाळा नांदेड असल्याचे निष्पन्न करुन नमुद गुन्हयात गेला माल पाण्याची टाकी, प्लेट, पाण्याची मोटार, खुर्ची असा एकुण 9,200/- रुपयाचा ऐवज हस्तगत केला आहे. सदर आरोपींकडुन दोन्ही गुन्हयातील एकुण 59,200/- रु.चा ऐवज हस्तगत केला आहे.

सदर कार्यवाहीत पोलीस निरीक्षक श्री रणजित भोईटे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री चौधरी ASI बी.एन. गजभारे, डिबी. बिसाडे, पोहेकॉ/664 मोहन हाके, पोहेकॉ/436 एकनाथ मोकले, पोना /2543 हबीब चाऊस, पोना/1809 मिलींद नरबाग, पोना /2556 लक्ष्मण दासरवार, पोना/2117 धिरज कोमुलवार पोकों /2908 काकासाहेब जगताप, पोकों/471 नजरे आजम देशमुख, पोकों/2890 कोरनुळे, पोकॉ/493 गायकवाड, पोकॉ/3065 राठोड यानी कर्तव्य पार पाडले आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button