महाराष्ट्रा

बिभत्स अंगप्रदर्शन करणाऱ्या उर्फीविरोधात कायदेशीर कारवाई करा; चित्रा वाघ यांचे निवेदन

पुढारी ऑनलाईन डेस्क: मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी (जावेदवर) तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली. त्यांनी CP Mumbai Police जाणि Mumbai Police यांना टॅग करत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मुंबई पोलिस त्याचबरोबर सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था अधिकाऱ्यांची भेट घेत कारवाई करण्याची मागणी केल्याचा उल्लेख केला आहे. 
चित्रा वाघ यांनी तक्रार केलेले परिपत्रक ट्विटरवर शेअर केले आहे त्या पत्रकात म्हटले आहे- उफी जावेद या अभिनेत्रीने भर रस्त्यात आपल्या देहाच कलेले प्रदर्शन समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनले आहे. घटनेने दिलेला आचार, विचार स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उघड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली नसेल. स्त्री देहाचे असे मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यातील अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या सभ्यतेला कलंक आहे या अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे याच्याशी समाजाला काहीच देणेघेणे नाही, मात्र केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे.
तिला आपल्या देहाचे प्रदर्शन करायचे असेल तर तिने ते चार •मितीच्या जाड जरूर करावे. मात्र अशा पद्धतीच्या भावना चेतवणाऱ्या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीला आपण खतपाणी। घालत आहोत याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल. या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची मागणी आहे.
20 डिसेंबर रोजी चित्रा वाघ यांनी आणखी एक टविट केलं होतं. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी उर्फी जावेदला वेडया ठोकण्याची मागणी केली होती. पहिल्या ट्विटमध्ये म्हटले होते शो 5555 अरे हे काय चाललय मुंबईत रस्त्यांवर सार्वजनिक ठीकाणी उत्तानपण नगटपणा करणारी ही बाई हिला रोखायला कडे IPC/CRPC आहेत की नाही तात्काळ बेड्या ठोका हीला एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत तर ही क्या अजून विकृती पसरवतीय 

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button