जीवन साधना फाउंडेशन व पवित्र बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या पुरस्कारांचे वितरण
नांदेड दि.4 जीवनसाधना फाऊंडेशन व पवित्र बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कर्करोग निवारण दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रा.सौ.उज्ज्वला विकास शिंदे यांनी स्वागतगीत सादर केले. यावेळी मुखाचा कर्करोग याविषयावर डॉ.सायली इंगळे यांचे तर ” लोककला ” या विषयावर सुप्रसिद्ध समाजप्रबोधनकार एस.एम.कदम (सुखानंद) यांनी माहिती दिली. यावेळीशिक्षण,पत्रकारीता,समाजसेवा, ग्रामविकास,महिला- बालकल्याण व सामाजिक कार्य यांसारख्याविविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना विभागीय, राज्यस्तरीय,राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर गायन,वादन,नृत्य,क्रीडा,वक्तृत्वकला,चित्रकलेत पारंगत असणाऱ्या
सुयशा क्षीरसागर,सृष्टी शिंदे, निशा सूर्यवंशी आणि आदित्य थोरात यांच्यासह काही प्रतिभावान विद्यार्थांचा जाणीव सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम बंदा घाट, वजीराबाद भागातील प्रतिभा निकेतन महाविद्यालयाच्या इंदिरा माधव
सभागृहात घेण्यात आला.अध्यक्षस्थानी दिलीपकुमार धुळे होते. सदर कार्यक्रमात खालील मान्यवरांना जीवनसाधना फाऊंडेशनच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
विभागीय पुरस्कार (ईगल रीजनल अवॉर्ड):
डॉ.संतोषकुमार स्वामी ( वैद्यकीय व समाजसेवा), ए.यु.चाटणकर (प्रशासन), प्रमोद नादरे (पत्रकारीता), सरपंच गंगाप्रसाद खारोडे ( मुरुंबा), सरपंच सौ.त्रिवेणाबाई विठ्ठोरे ( किन्होळा) , सरपंच सौ.कमलबाई एकनाथ कऱ्हाळे (परजना) ग्रामविकास क्षेत्रासाठी आदर्श सरपंच,
राज्यस्तरीय पुरस्कार ( ईगल स्टेट अवॉर्ड): नौनिहालसिंघ जहागीरदार ( समाजसेवा ),प.पू.ई.भ.बालमुकुंद खेडकर ( धार्मिक व भजन), प्रा.डॉ. उषा धसवाडीकर उदगीर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.बाबासाहेब भुक्तरे (शिक्षण),आसाराम सोळंके (समाजसेवा), सुधाकर गणपतराव कदम,अर्धापूर ( समाजसेवा व राजकीय), सरपंच यशवंत रावले (ग्रामविकास- आदर्श सरपंच)
पवित्र ब.सेवाभावी संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार
(फिनिक्स ह्युमॅनिटी स्टेटअवॉर्ड): सत्यनारायण बोखारे (समाजसेवा), केशव डुकरे (ग्रामविकास), भीमराव बोखारे (पत्रकारीता ), श्रेयस कदम समाजसेवा व रक्तदान), सौ.सुनीता चौहान (समाजसेवा), डॉ.प्रकाश इंगळे (महिला- बालकल्याण सामाजिक कार्य), सरपंच
रामकिशन भोकरे व सरपंच गणेश उर्फ राजु पाटील इंगोले (ग्रामविकास- आदर्श सरपंच)पवित्र बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार
(फिनिक्स ह्युमॅनिटी नॅशनलअवॉर्ड ) प्रा.डॉ.सागर पाटील, मंगळवेढा (शिक्षण व संशोधन), प्रा.डॉ.विकास शिंदे, वडाळा सोलापूर (शिक्षण),
सुधाकर माणिकराव कदम( लोककला व समाज प्रबोधन), प्रा.डॉ.महादेव डिसले,बार्शी (उत्कृष्ट शिक्षक/ प्राध्यापक तथा रा.से.यो.कार्यक्रमाधिकारी), धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर समाजसेवा) यांना सन्मानपत्र,सन्मानचिन्ह, स्नेहवस्त्र,महापुरुषांचे जीवनचरित्र देऊन सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या डॉ.सायली इंगळे, सौ.रेखा मनाठकर, स.रणजितसिंघ चिरागीया यांनी आपले मनोगत व्यक्त केले.पुरस्काराचे मानकरी असलेल्या मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.संतोष नवघरे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला धुळे, सौ.जयश्री ठाकूर, सौ.अनुराधा रावले,गणेश रावले, शेख नाजीमा,उपसरपंच संभाजी जोगदंड व शिरड शहापूरचे सर्व ग्रा.पं.सदस्य, प्रा.ए.जी.वाघमोडे, प्रा.एस.टी.पाटील यांच्यासह परिसरातील युवक,युवती, महिला,पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.