मराठवाडा
कोट्यवधींच्या निधीतून परभणी शहराचा होणार कायापालट, अंतर्गत रस्ते, भौतिक सुविधा वर भर देणार… खासदार फौजिया खान यांचे प्रतिपादन
परभणी : (जिल्हा प्रतिनिधी) हजरत सय्यद शहा तुराबूल हक्क दरगाहच्या उर्सातून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाला गेल्या दोन वर्षात तब्बल पाच कोटी रुपयांचे उत्पन्न झाले.या पैशाचा उपयोग परभणी शहराच्या विकासा साठीच व्हावा या साठी आम्ही यशस्वी प्रयत्न केले. शहरातील अंतर्गत रस्ते,नाल्या व दरगाह वाल कंपाउंड या साठी आम्ही तब्बल पाच कोटींची मंजुर करून घेतली.खासदार स्थानिक व वक्फ मंडळाच्या निधींतून शहराचा सर्वांगीण विकास व्हावा असा आमचा मानस आहे.उरुसाच्या उत्पनाचा विनीयोग शहरातील विकासासाठीच व्हावा अशी आमची आग्रही भूमिका होती,त्याला वक्फ मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली असल्याचे प्रतिपादन खासदार फौझियाखान व्यक्त केले.या पुढे “आमचा पैसा, आमचा विकास”या तत्वावरच मंडळा सोबत आम्ही काम करत राहू अशी कणखर भूमिकाही फौजिया खान यांनी घेतली.
उर्स मधुन होणाऱ्या उत्पन्नाचा विनीयोग केवळ परभणीचे विकासा साठीच
१) विकासाचा ध्यास डोळ्या समोर ठेवून परभणी शहर व जिल्ह्याचा विकास कसा करता येईल,या कडे आमचे लक्ष केंद्रीत आहे.त्या साठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना द्वारे जास्तीचा निधी मंजूर करण्यासाठी ही आम्ही संबंधित विभागाचे मंत्री व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला आहे.लवकरच यात यश मिळेल अशी अपेक्षा आहे.२०२१-२२ ते २०२३-२४ या तीन वर्षांच्या अर्थसंकल्पीय वर्षात आम्ही अनेक महत्वाच्या कामांना मान्यता मिळवून घेतली.यात विशेषतः उस्मानिया मस्जिद जवळ सभागृह तयार करणेचे 20 लाखाचे काम तसेच कोर्टाकडे जाणारे रस्त्याचे लगत नाली तयार करणे व जिल्हा वक्फ कार्यालयासमोर सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता करणे हे काम रुपये १५ लाखाचे असून ह्या दोन्ही कामाकरीता आम्ही ३५ लाखाचा निधी माझ्या स्थानिक विकास निधी मधून उपलब्ध करुन दिला आहे.
२) हजरत सय्यद शहा तुराबुल हक दर्गा परिसरात माझ्या स्थानिक विकास निधी मधून रुपये पन्नास लक्ष दिले आहेत. त्यामधून त्या ठिकाणी कब्रस्तान विकसित करण्याचे काम केले जाणार आहे.
३) हजरत सय्यद शाह तुराबुल हक्क दर्गा परिसरात पर्यटन विकास कार्यक्रमांमधून दोन कामे केली जाणार आहेत. ज्यात एक दर्गाह जवळ रस्त्याचे बाजूने नाली व रस्ता दुरुस्ती व दर्गा सुशोभीकरणाचे काम प्रस्तावित आहे. या कामाकरीता अंदाजे ४५ लाखाची तरतुद अपेक्षित आहे. हे काम पर्यटन विकास योजनेतुन होईल. यासाठी खासदार म्हणून पाठपुरावा करत आहोत. अशी माहिती डॉ फौजिया खान यांनी दिली.
बॉक्स
४) हजरत सय्यद शाह तुराबुल हक दर्गा परभणी येथील ऊर्सामधून गतवर्षी जवळपास सव्वा दोन कोटी व यावर्षी जवळपास अडीच कोटी रुपये महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळास प्राप्त झालेले आहेत व ते महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाकडे जमा आहेत. त्या मधून दर्गाह परिसराला कंपाउंड वॉल केली जाणार आहे. याकरीता तीन कोटी नव्वद लाखाची तरतुद करण्यासाठी मी स्वतः वक्फ मंडळाकडे वारंवार पाठपुरावा केला व या महिन्यात झालेल्या बैठकीत या कामास मान्यता मिळवून घेतली.