मराठवाडा

परभणीत केमिस्ट असोसिएशनची निवडणूक संपन्न, पूर्व आणि पश्चिम विभागासाठी झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय. 

परभणी, प्रतिनिधी परभणी शहर केमिस्ट असोसिएशनची त्रिवर्शिक निवडणूक आज औषधी भवन येथेपार पडली. पूर्व आणि पश्चिम असे दोन विभागा साठी झालेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय झाला. विजयी उमेदवारांनी यावेळी फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला.
या निवडणुकीत मुन्ना घाडगे, नारायण मुंदडा, शाहिद अन्सारी यांच्या परिवर्तन पॅनल कडून पूर्व अध्यक्ष पदाकरिता शेख अजीम यांना 97 मते पडली यांचे प्रतिस्पर्धी प्रशांत शिंदे यांना 60 मते पडली.  तसेच इनायत बेग यांना 30 मते पडली उपाध्यक्षपदी निसार अहमद खान हे अगोदरच बिनविरोध निवडून आले. त्यांच्या विरोधात एकही अर्ज आला नसल्याने निसार अहमद खान यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर पश्चिम मतदार संघातून अध्यक्षपदी नितीन चिद्रवार यांना 135 मते पडली, यांचे प्रतिस्पर्धी अनिल देशमुख यांना 65 मते पडली. तर उपाध्यक्षपदी झाकीर हुसेन हे यापूर्वीच बिनविरोध निवडले गेले आहे.
तर सचिव पदाकरिता पूर्व विभागात सय्यद हामेद हे बिनविरोध निवडून आलेत. तर पश्चिम साठी झालेल्या निवडणुकीत वैजनाथ दहिफळे यांना 122 मते पडली यांचे प्रतिस्पर्धी माणिक पवार यांना 78 मते पडली. ह्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचा दोन्ही मतदार संघात एकतर्फी विजय झालेला आहे. निवडणुकीसाठी मुन्ना घाडगे, शाहिद अन्सारी, नारायण मुंदडा, सय्यद बाबर, अमजद खान, आदींनी विशेष परिश्रम घेतले होतले.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button