जिला

धर्माबादेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने जोडे मारो आंदोलन

              
धर्माबाद। राज्याचे लक्ष लागून असलेल्या 16 आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने दिलेल्या निकालाचा धर्माबादेत गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले.धर्माबाद शहरातील पानसरे चौक येथील शिवसेना फलका समोर  शिवसैनीकांनी उद्धव ठाकरे यांच्या स्मरणार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

शिंदे गटाच्या 16 आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे सरकारच्या बाजूने दिलेल्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांच्या स्मरणार्थ धर्माबाद शिवसेना फलका जवळ ठाकरे गटाने यावेळी केंद्र राज्य सरकार विधानसभा अध्यक्ष यांच्या विरोधात आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्मरणार्थ घोषणाबाजी करण्यात आली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला काळे फासून खिशाला काळ्याफिती लावून शिवसेनेने व्यक्त निषेध राहुल नार्वेकर यांचे प्रतिमा चप्पल बूटाचा मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला. 

यावेळी उपजिल्हाप्रमुख गणेश गिरी,ज्येष्ठ शिवसैनिक गणपत कात्रे, तालुकाप्रमुख रामचंद्र रेड्डी, तालुका संघटक पंचायत समितीचे माजी सभापती मारोती पाटील कागेरु शहर प्रमुख बालाजी बनसोडे गणेश गिरी मनोज मनुरकर, उपशहरप्रमुख फेरोज खुरेशी, मुपडे, सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button