जिला

जल जीवन मिशनच्या जनजागृतीसाठी शाळास्‍तरावर आज निबंध स्पर्धाचे आयोजन

 

 

 

नांदेड,1- जल जीवन मिशनच्या प्रचार प्रसिद्धीसाठी व विद्यार्थ्यांमध्ये पिण्याचे पाणी व जलसंवर्धन याविषयी जनजागृती होण्यापसाठी शाळा स्तरावर आज मंगळवार दिनांक 2 जानेवारी निबंध स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे.

या स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक अशा दोन गटात स्‍पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. निबंध स्पर्धेसाठी पाऊस पाणी संकलन, पाणी आडवा पाणी जिरवा, जल हेच जीवन, माझ्या गावातील पाणीपुरवठा, जलजीवन मिशन व माझ्या गावाचा विकास व जलसंवर्धन काळाची गरज हे विषय देण्यात आले आहेत. दोन्ही गटातील निबंधाची शब्द मर्यादा 1500 इतकी असून वेळ 40 मिनिटे राहणार आहे. तरी या स्‍पर्धेत मोठया प्रमाणात विद्यार्थ्‍यांने सहभाग घ्‍यावा असे, आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास योजनेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, प्राथमिकच्‍या शिक्षणाधिकार डॉ. सविता बिरगे, माध्‍यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले आहे. यापूर्वीच जिल्‍हास्‍तरावरुन सर्व गटशिक्षणाधिकारी यांना पत्र पाठ‍वून नियोजन करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. त्‍याप्रमाणे सर्व प्राथमि‍क व माध्‍यमिक शाळांतून स्‍पर्धेचे आयोजन करावे. प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्‍त स्‍पर्धाकांचे पंचायत समिती स्‍तरावर स्‍पर्धा घेण्‍यात येणार आहेत.

उद्या महाविद्यालयीन युवकांसाठी वक्‍तृत्‍व स्‍पर्धा

उद्या बुधवार दिनांक 3 जानेवारी रोजी जिल्‍हयातील सर्व महाविद्यालयातून वक्‍तृत्‍व स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे. स्‍पर्धेसाठी पाऊस पाणी संकलन, पाणी आडवा पाणी जिरवा, जल हेच जीवन, माझ्या गावातील पाणीपुरवठा, जल संवर्धन व पाण्‍याचे महत्‍व, पाण्‍याचे वितरण व करप्रणाली, पुरवठा योजनेतील लोकसहभाग व पाणी पुरवठा योजनेची देखभाल दुरुस्‍ती हे विषय आहेत.

शालेय व महाविद्यालयीन स्तरावरून घेण्‍यात आलेल्‍या दोन्‍ही स्‍पर्धेतील प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थींचे तालुकास्तरावर स्‍पर्धा घेण्‍यात येणार आहेत. तालुकास्तरावर अनुक्रमे एक ते तीन क्रमांक निवडले जातील. त्या नंतर जिल्हास्तररावर स्‍पर्धा घेवून स्पर्धकांमधून प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक घोषित केले जाणार आहेत. दोन्ही गटात प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे 21 हजार, 11 हजार व 5 हजार 500 रुपये रोख बक्षीस, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button