काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे दोन सत्रात पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत
नांदेड, दि.19 – तेलंगणातील खानापूर व आसिफाबाद विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे आज विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे विमानतळावर दोन सत्रात जंगी स्वागत केले.
सद्या शेजारी राज्य असलेल्या तेलंगणामध्ये निवडणुकीची धूम चालू आहे. प्रचार शिगेला पोहोंचला आहे. सीमे लगत असलेल्या निजामाबाद,आदिलाबाद जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी अनेक नेते विमानाने येत आहेत. नांदेड हे या जिल्ह्यासाठी जवळचे विमानतळ आहे. प्रियांका गांधी यांचे आज सकाळी 11.30 वाजता विमानतळावर आगमन झाले. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, तेलंगणाची प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी आ. अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, आ. मोहनअण्णा हंबर्डे, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी महापौर अब्दुल सत्तार,
माजी उपमहापौर मसूद खान, डॉ.अंकुश देवसरकर, डॉ.रेखा चव्हाण, अभिजित सपकाळ यांनी सकाळच्या सत्रात प्रियांका गांधी यांचे स्वागत केले.
खानापूर व आसिफाबाद येथील जाहीर सभांनंतर प्रियांका गांधी व अशोकराव चव्हाण यांचे हेलिकॉप्टरने दुपारी 3.40 वा. पुन्हा एकदा प्रस्थान करण्यासाठी विमानतळावर आगमन झाले. यावेळी माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, माजी आ.अमरनाथ राजूरकर, आ.जितेश अंतापूरकर, डॉ.सौ.मीनल खतगावकर, काँग्रेसचे लोहा तालुकाध्यक्ष शरद पवार,प्रा.मनोहर पवार, अभिजित सपकाळ, विठ्ठल पावडे आदी पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.