जिला

नवीन शिधापत्रिका अर्जदारांना त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या मागणी

 

काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने एका निवेदनाद्वारे नांदेड निवासी उपजिल्हाधिकारी यांना नवीन शिधापत्रिका अर्जदारांना त्वरित उपलब्ध करून देण्याची तसेच शहराची लोकसंख्या लक्षात घेता गोरगरीब नगरीकांना धान्य मिळण्या करीता पन्नास हजार कोठा वाढविण्याची मागणी केली. या वेळी माजी उपमहापौर तथा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मसूद अहमद खान, माजी सभापती तथा अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष अब्दुल शमीम अब्दुल्ला , मा. नगरसेवक तथा अल्पसंख्याक वि.प्रदेश सचिव सय्यद शेर अली, मा.नगरसेवक अब्दुल हफिज बागवान, अल्पसंख्याक विभाग नांदेड उत्तर अध्यक्ष मोहम्मद जुबेर अहमद, उपाध्यक्ष रफीक पठाण, सरचिटणीस साजिद खान, कॉंग्रेस कार्यकर्ता एजाज हुसैन, सय्यद अहसांन, शेख नाजीम आदींचा समावेश होता.

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button