जिला

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस ताफ्यावर दगडफेक करणाऱ्या 41 जणांना अटक

नांदेड(प्रतिनिधी)- मराठा आरक्षण आंदोलन हिंसक वळण घेत आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित रहावी या दृष्टिकोनातून माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांनी जमावबंदी आदेश काल निर्गमित केले पण या आदेशा अगोदर काही समाज विघातक शक्तींनी पोलीस अधिक्षक आणि अपर पोलीस अधिक्षक यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांवर दगडफेक करून जखमी केले यातील दगडफेक करणाऱ्या 46 जणांच्या नावासह आणि अनोळखी 15 ते 20 जणांविरुध्द कुंटूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यातील 41 लोकांना पोलीस प्रशासनाकडून तत्काळ अटक करण्यात आली आहे. वृत्तलिहिपर्यंत त्यांना पोलीस कोठडी मिळविण्यासाठी न्यायालयात नेण्याची प्रक्रिया सुरू होती. दिनांक 30 रोजी विनापरवाला मराठा आरक्षणा च्या नावाखाली हिंसक प्रवृत्तीच्या काही लोकांनी महामार्गावर अवैधपणे रास्ता रोको करून पोलीस ताब्यावर दगडफेक केली या दगडफेक करणाऱ्या जमावा विरोधात कुंटूर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला याविषयी सविस्तर माहिती अशी की सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल बहात्तरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि30 ऑक्टोबर रात्री 10 वाजल्यापासून बिना परवाना बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू झाले.

 

मी व माझे सहकारी पोलीस अंमलदार तेथे गेलो असतांना सकल मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी झाडे, काठ्या, दगड,मोठे टायर जाळून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत घोषणा देत होते. त्यामुळे हैद्राबादकडे जाणारा रस्ता बंद झाला होता.31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजेच्यासुमारास या हिंसक आंदोलनकर्त्यांमधील संतोष दासराव जाधव, मनोहर बालाजी जाधव, मारोती रामराव जाधव, कृष्णा संभाजी जाधव, शंकर बालाजी थेटे, व्यंकट गोविंद जाधव, योगेश सुधाकर जाधव, मारोती गोविंद जाधव, शिवाजी नागोराव जाधव, माधव सुधाकर जाधव, दत्ता रामराव जाधव, साहेबराव परशुराम अडकिणे, महेश विठ्ठलराव जाधव, शेख शादुल शेख शौकत, शिवम दिगंबर कागडे, मारोती प्रल्हाद जाधव, शंकर बाबा गाडगे, किरण सूर्यकांत जाधव, गणेश व्यंकट जाधव, तिरुपती संभाजी जाधव, शाहदत्त शिवाजी जाधव, योगेश लक्ष्मण जाधव, श्रीकांत गोविंद कदम, विजय बालाजी जाधव, अंकुश संभाजी जाधव, व्यंकट शंकर पवार, संभाजी औसाजी कदम, अमोल नावंदे, अमोल लंगोटे, गजानन जाधव, प्रदीप जाधव, सुरज नादरे, श्रीनिवास जाधव, धिरज जाधव सर्व रा. कृष्णर त्याचबरोबर अनेक व्यक्ती ज्यांची नावे माहित नाहीत अशा सर्वानी मिळून एम. एच. 26 बी.एक्स.5357 या पोलीस गाडीची तोडफोड केली.तसेच माधव प्रल्हाद तोडे, ज्ञानेश्वर गजानन शिंदे रा. अंतरगाव ता. नायगाव तसेच माधव संभाजी पांडे रा. रुई (बु), गजानन रामराव पांचाळ रा. कोकलेगाव, गजानन पंढरी ताटे रा. चव्हाणगल्ली नायगाव, सदाशिव सिताराम जाधव, ओंकार जाधव रा. निळेगव्हाण, शिवशंकर आनंदा कदम, दत्ता बालाजी कदम रा. हिप्परगा, दत्ता बालाजी कदम, रा.भायेगाव,

 

रमेश बालाजी ढगे रा. वझीरगाव यांच्यासह अनेक खाजगी वाहनांना तोडफोड करून त्यांचे नुकसान केले. ध्वनीक्षेपकावर या बेकायदा रीतीने जमा झालेल्या जमावास तुम्ही परत जा शांतता राखा अशा सुचना पोलीस देत असतांना जमावाने दगडफेक सुरू केली. त्यात पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अविनाशकुमार, सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडुरंग माने, पोलीस अंमलदार गजानन मगर, लक्ष्मण मारगोंडे, अभिजित पाटील, रविकुमार हाराळे, योगेश बोधगिरे, अनिलकुमार गायधने, राजू तेलंग, मनोज पारदे, शेख मोहम्मद अलीम मोहम्मद रहिम, संतोष वागदकर असे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले.जमाव आणखी अक्रमक होईल, गाड्यांची तोडफोड करेल आणि आग लावेल म्हणून पोलीसांनी आपल्या बळाचा वापर करून जमाव पांगवला. आणि या हिंसक जमावा विरोधात कुंटूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यातील जवळपास 41 जणांना अटक करण्यात आली आहे. घडलेल्या या हिंसक प्रकाराची प्रशासनाद्वारे तात्काळ दखल घेण्यात आली आणि नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्याद्वारे जमावबंदी आदेश लागू करण्यात आले या जमाव बंदी आदेशामुळे जिल्हाभरात होणाऱ्या हिंसक घटनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल तसेच आंदोलनकर्त्यांनी शांततापूर्ण आंदोलन करावे कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वर्तन करू नये अन्यथा त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा प्रशासनाद्वारे देण्यात आला आहे

Munawar Khan

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button