रवींद्र तहकीक यांच्या अटकेचा मुदखेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने निषेध तहसीलदारांना दिले निवेदन
मुदखेड़ प्रतिनिधि (मोहम्मद हकीम)
छत्रपती संभाजी नगर येथील दैनिक लोकपत्र चे कार्यकारी संपादक रवींद्र तहकीक यांना अटक करून लोकशाहीची मुस्कटदाबी केलेल्या घटनेच्या निषेधार्थ तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले रवींद्र तहकीक यांनी शासनाच्या विरोधात सडेतोड भूमिका घेऊन लेखन केल्याबद्दल त्यांना जाणीवपूर्वक अटक करून लोकशाही स्वातंत्र्याची गळचे पी करत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न केला जात आहे .त्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्र प्रतिनिधी यांना स्पष्ट आणि निर्भीडपणे लिखाण करणाऱ्या वर काही मर्यादा येत आहेत त्यांच्यावर प्रतिबंध लावण्याच्या उद्देशाने अटक करण्यात आली आहे .
यापूर्वी देखील लोकशाही वृत्तवाहिनी काही तासासाठी बंद करण्यात आली होती या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे लोकशाहीवर घाला घातला जात आहे.या घटनेचा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला असून याबाबत तालुका पत्रकार संघाच्या वतीने निषेधाचे लेखी निवेदन नायब तहसीलदार संतोष कामठेकर यांना देण्यात आले यावेळी मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हा सह सचिव संजय कोलते, तालुका अध्यक्ष शेख जबार, प्रल्हाद म्हस्के, गंगाधर डांगे पाटील, शेख अजगर हुसेन, शेख शमशुद्दीन, अतिक अहेमद, सिद्धार्थचौदं ते, साहेबराव गागलवाड, शेख इरफान ,संतोष सावंत , अब्दुल हा की म, यांची उपस्थिती होती.