ईनामी जागेत असलेले अनाधिकृत मंगल कार्यालय हटविण्याची मागणी मंगलकार्यालयावर नगरपरिषदेचे अभियंता मेहेरबान
(बिलोली/प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या बिलोली येथील ईनामी जमिनी वर अनाधिकृतपणे शौकत मंगल कार्यालय चालवणाऱ्या वादग्रस्त तात्पुरते मुतवल्ली मिर्झा शौकत बेग यांच्या वर नगररचना अधिनियम १९६६ कलम अंतर्गत गुन्हा दाखल करून मुख्य रोडला वाहतूकिस अडथळा निर्माण होणाऱ्या व प्राथमिक शाळा समोरील विनापरवानगी फंक्शन हाॕलची ती जागा तात्काळ खुली करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग यांच्याकडे करण्यात आली.
शहरातील राज्य संरक्षित वास्तू असलेल्या ऐतिहासिक मस्जिद व दर्गा परिसरात कोणत्याही शासकिय कार्यालयाची परवानगी न घेता ईनामी जागेवर अनाधिकृतपणे शौकत फंक्शन हाॕल सुरु असून फंक्शन हाॕल च्या गेट समोरच नगरपरिषदेची ईयत्ता १ ली ते ५ वी वर्गापर्यंत शाळा भरते.शाळेला जाण्यासाठी व येण्यासाठी,दुपारच्या सुट्टीत मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना याचा ञास होत असून अपघात होण्याची शक्यता आहे.मस्जिद परिसरात तालीमुल कुरान मदरसा चालते मदरसामध्ये कुरान पठणासाठी येणाऱ्या मुलांना सुध्दा ञास होत आहे.या अनाधिकृत शौकत फंक्शन हॉल मुळे मुलांना,जनतेला रोडवरुन येणाऱ्या जाणा-या सगळ्यांनाच फार त्रास होत असून हे वर्दळीचे ठिकाण असून वाहतूक ठप्प होत असल्यामुळे वाहनांमुळे अपघात होऊन शाळकरी मुलांचे जिव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.प्रशासनाने या अनाधिकृत चालणाऱ्या फंक्शन हाॕलला तत्काळ हटवून जागा खुली करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर शेख.ईरफान शेख.वाजीद,शेख.बाबा शेख.एखबाल,शेख.माजीद शेख.खुर्शिद,शेख.फैसल शेख.खुर्शिद,नबाजी बाबाराव सयाजी,विशालसिंह संग्रामसिंह चौहाण,संकेत बिलोलीकर,देविदास शंकर वाघेकर आदिंच्या नावे व स्वाक्ष-या आहेत.याबाबत सदरिल मंगलकार्यालयावर नगरपरिषदेचे अभियंता हे सध्या मेहेरबान दिसत आहे.तर दुसरीकडे जिल्हा वक्फ अधिकारी मुग गिळून गप्प आहे.औरंगाबाद येथील वक्फ मंडळाच्या कार्यालयात नव्यानेच पदभार घेतलेले मुख्य कार्यकारी अधिकारी काय कारवाई करतील याकडे येथिल जनतेचे लक्ष लागून आहे.सदरिल निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री सचिवालय कक्ष,मुख्याधिकारी,उपविभागिय अधिकारी,पोलीस अधिक्षक,जिल्हा वक्फ अधिकारी यांना देण्यात आले.